पतीचे वय जास्त, भाच्यासोबत अनैतिक संबंध, लग्नाचं स्वप्न पाहिलं; नवरा अडसर ठरला, उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 17:41 IST2025-01-17T17:38:38+5:302025-01-17T17:41:50+5:30
भाच्यासोबत पत्नीचे अनैतिक संबंध सुरू असल्याचे पतीच्या लक्षात आले. पतीने तेव्हापासूनच दोघांवर पाळत ठेवायला सुरूवात केली.

पतीचे वय जास्त, भाच्यासोबत अनैतिक संबंध, लग्नाचं स्वप्न पाहिलं; नवरा अडसर ठरला, उचललं टोकाचं पाऊल
उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका हत्या प्रकरणाचा मोठा खुलासा झाला आहे. एका शेतकऱ्याची हत्या दुसऱ्या कोणी नाही तर त्याच्या पत्नीने तिच्या प्रियकराच्या संगनमताने केली. तो प्रियकर दुसरा तिसरा कोणी नसून तिचा भाचा आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली.
हे प्रकरण खैरगडच्या बैरणी गावचे आहे. मंगळवारी रात्री ४३ वर्षीय सतेंद्र कुमार यांची गळा दाबून हत्या करण्यात आली. त्याची २३ वर्षीय पत्नी रोशनी आणि तिचा १९ वर्षीय भाचा गोविंद, तो अलीनगर कांजरा येथे राहतो, या दोघांनी मिळून हत्या केली. रोशनीने त्याचे पाय धरले आणि गोविंदने त्याचा गळा दाबला. अवैध संबंधात अडथळा निर्माण झाल्यामुळे सतेंद्रची हत्या करण्यात आल्याची कबुली दिली.
'तो' व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, काकाने बोलवून घेतलं हॉटेलवर; रूममध्ये जाताच तरुणीने...
अनेक दिवसापासून अनैतिक संबंध होते
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तिचा पती पत्नीपेक्षा २० वर्षांनी मोठा होता, तर भाचा हा तिच्या वयाचा होता. या दोघांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून मैत्री झाली, दोन वर्षांपूर्वी दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. ज्यावेळी पती घरी नसायचा तेव्हा दोघही घरी भेटत होते, एक दिवस पतीला या दोघांबद्दल संशय आला. यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. यानंतर, गोविंद आणि रोशनीने सतेंद्रला मारून लग्न करण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांनी सांगितले की, आरोपीला यापूर्वीही हत्या करायची होती, पण तो धाडस करू शकला नाही. मंगळवारी रात्री रोशनीने गोविंदला फोन केला होता. गोविंद टुंडला येथील एका महाविद्यालयात नर्सिंगचा विद्यार्थी आहे.
हत्या केल्यानंतर गोविंद रात्री ३ वाजता घराबाहेर पडला. वाहतुकीची साधने नसल्याने तो चार-पाच किलोमीटर चालत गेला. सकाळी ऑटोने घरी पोहोचलो. नंतर, तो पुन्हा सतेंद्रच्या घरी आला आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून होता.
पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.