Crime News : प्रेमासाठी महिला सरपंचाने हद्द ओलांडली; पती आणि तीन मुलांनां सोडून फरार झाली, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 14:56 IST2022-03-20T14:56:07+5:302022-03-20T14:56:56+5:30
Crime News: एक विवाहित महिला सरपंच त्याच गावातील एका प्रियकराच्या प्रेमात पडली. दोघांनीही एकमेकांसोबत जगण्यामरण्याच्या आणाभाका घेतल्या. अखेर त्यांच्यातील संबंध इतके पुढे गेले की या महिलेने त्या प्रियकरासाठी कुटुंब, पती आणि मुलांनाही सोडले.

Crime News : प्रेमासाठी महिला सरपंचाने हद्द ओलांडली; पती आणि तीन मुलांनां सोडून फरार झाली, त्यानंतर...
पाटणा - बिहारमध्ये प्रेमप्रकरणातून घडलेली धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक विवाहित महिला सरपंच त्याच गावातील एका प्रियकराच्या प्रेमात पडली. दोघांनीही एकमेकांसोबत जगण्यामरण्याच्या आणाभाका घेतल्या. अखेर त्यांच्यातील संबंध इतके पुढे गेले की या महिलेने त्या प्रियकरासाठी कुटुंब, पती आणि मुलांनाही सोडले. ती घरातून पसार झाली तेव्हा कुटुंबीयांना सुरुवातीला काहीतरी घातपात झाल्याची शंका आली. मात्र जेव्हा प्रेमप्रकरणातून सदर महिला पसार झाल्याचे समजले तेव्हा तिच्या पायाखालील वाळू सरकली.
महिला सरपंचाच्या प्रेमप्रकरणाची ही घटना सीतामढी जिल्ह्यातील कन्हौली ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खाप खोपराहा पंचायतीमध्ये घडली. तिथे एक ३८ वर्षीय महिला सरपंच ९ मार्च रोजी फरार झाली. खूप शोधाशोध केल्यावर पतीने तिचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांमध्ये दिली. तसेच गावातील तीन जणांविरोधात संशय व्यक्त केला.
महिला सरपंचाच्या पतीने सांगितले की, ९ मार्च रोजी सकाळी फिरण्यास गेले असताना ही महिला बेपत्ता झाली. त्यानंतर त्याने तिचा खूप शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. तसेच तिचा मोबाईलही स्वीच ऑफ आला. थकून भागून १५ मार्च रोजी त्याने १५ मार्च रोजी पोलीस ठाण्यात पत्नीचे अपहरण झाल्याची फिर्याद दिली. त्यात तीन जणांवर संशय व्यक्त केला. तसेच या तिघांनी लग्नाचा हेतू आणि माझ्या प्रतिष्ठेला धक्का देण्यासाठी माझ्या पत्नीला फूस लावून पळवले, असा आरोप केला.
दरम्यान, गावापासून शहरापर्यंत सर्वत्र या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. दरम्यान, मुले लग्नाची झाली असताना सदर महिला प्रियकरासोबत फरारी झाल्याने लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. या महिला सरपंचालाला दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. एक मुलगा बीएससीचं शिक्षण घेत आहे. तर मुलगी दहावीत आहे, तर दुसरा मुलगा हा नववीत आहे.