शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

Crime News: जामीन मिळवून देण्याच्या बहाण्याने तुरुंगात असलेल्या प्रसिद्ध उद्योगपतींच्या पत्नींना २०४ कोटींचा गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 3:41 PM

Crime News: रेनबेक्सी कंपनीचे माजी प्रवर्तक मलविंदर सिंग आणि शिविंदर सिंग यांना जामीन मिळवून देण्याच्या आणि तुरुंगामध्ये सुरक्षा पुरवण्याच्या बहाण्याने त्यांच्या पत्नींना एका दलालाने तब्बल २०४ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली - रेनबेक्सी कंपनीचे माजी प्रवर्तक मलविंदर सिंग आणि शिविंदर सिंग यांना जामीन मिळवून देण्याच्या आणि तुरुंगामध्ये सुरक्षा पुरवण्याच्या बहाण्याने त्यांच्या पत्नींना एका दलालाने तब्बल २०४ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. (Crime News) याबाबतची तक्रार या उद्योगपतींच्या पत्नींनी पोलिसांमध्ये केली आहे. (Famous industrialists Singh brothers wives cheated RS 204 crore for bail)

याप्रकरणी आधीच एक गुन्हा नोंद झाला होता. आता दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अजून एक गुन्हा दाखल करवून घेतला आहे. याबाबत रेनबेक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंग यांची पत्नी अदिती सिंग हिने आधीच तक्रार दिलेली होती. आता दुसरे प्रमोटर मलविंदर सिंग यांची पत्नी जपना सिंग हिनेसुद्धा पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.

रेनबेक्सीचे माजी प्रमोटर असलेले सिंग ब्रदर्स ऑक्टोबर २०१९ पासूनच तुरुंगात आहेत. या दोघांवर रेलिगेयर फिनवेस्ट आणि या कंपनीची पेरेंट्स कंपनी असलेल्या रेलिगेयर एंटरप्राइजकडून २ हजार ३९७ कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे.

पहिल्या प्रकरणामध्ये आरोपी सुकेश चंद्रशेखर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाहोता. आता दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने रोहिणी जेलमध्ये असलेल्या सुकेश चंद्रशेखरविरोधात फसवणूक, खंडणी आणि गुन्हेगारी कारस्थान असा अजून एक गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक गुन्हे शाखा फसवणूक आणि खंडणीप्रकरणी सुकेश चंद्रशेखर सिंह याची चौकशी करत आहे.

रेनबेक्सीचे माजी प्रवर्तक मलविंदर सिंग यांच्या पत्नीने तक्रारीत सांगितले की, तिच्याकडून जामिनासाठी चार कोटी रुपये उकळण्यात आले. तत्पूर्वी दाखल एफआयआरमध्ये शिविंदर सिंग यांच्या पत्नीने जामीनासाठी २०० कोटी रुपये घेतल्याची तक्रार दाखल केली होती.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीIndiaभारत