धक्कादायक! कार आणि 2 लाख न दिल्याने पतीने दिला ट्रिपल तलाक; 12 वर्षांचं नातं क्षणात संपलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 16:27 IST2021-09-21T16:20:28+5:302021-09-21T16:27:41+5:30

Crime News : 2 लाख आणि कार न मिळाल्याने संतप्त झालेल्या एका व्यक्तीने पत्नीला ट्रिपल तलाक दिल्याची घटना समोर आली आहे.

Crime News dowry case teen talaq divorces fir against 6 person including husband | धक्कादायक! कार आणि 2 लाख न दिल्याने पतीने दिला ट्रिपल तलाक; 12 वर्षांचं नातं क्षणात संपलं

धक्कादायक! कार आणि 2 लाख न दिल्याने पतीने दिला ट्रिपल तलाक; 12 वर्षांचं नातं क्षणात संपलं

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. 2 लाख आणि कार न मिळाल्याने संतप्त झालेल्या एका व्यक्तीने पत्नीला ट्रिपल तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. बुलंदशहरातील गुलावठी कोतवाली परिसरातील एका महिलेने 12 वर्षांनंतर आपल्या पतीवर हुंडा न दिल्याने ट्रिपल तलाक दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासोबतच तिने पतीसह सासरच्या मंडळींनी देखील हुंड्यासाठी आपला खूप छळ केल्याचं म्हटंल आहे. सहा जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, 2009 मध्ये गुलिस्ता या महिलेचा मेरठच्या शकीलसोबत निकाह झाला होता. गुलिस्ताच्या कुटुंबाने निकाहाच्या वेळी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार हुंडा दिला होता. तसेच मोठ्या प्रमाणात खर्च देखील केला होता. पण निकाहानंतर सासरची मंडळी खूश नव्हती. ती आणखी हुंडा हवा म्हणून अडून बसली होती. ज्यावेळी गुलिस्ताने हुंडा आणण्यास नकार दिला तेव्हा तिचा मानसिक आणि शारीरीक छळ करण्यात आला. याच दरम्यान गुलिस्ताने दोन मुलांना जन्म दिला. मुलांच्या जन्मानंतरही गुलिस्ताचा पैशासाठी छळ सुरूच होता. 

"बेदम मारहाण करण्यात आली, छळ झाला"

माहेरच्यांकडे दोन लाख रुपये आणि कारची मागणी करण्यात आली. महिलेने पोलिसांत केलेल्या तक्रारीत पती शकील, दीर अकरम, सासू फातिमा, सासरे असरफ यांच्यासह आणखी काही नातेवाईकांनी कारची मागणी केल्याचं म्हटलं आहे. तसेच यासाठी आपल्या बेदम मारहाण करण्यात आली, छळ झाला आणि कायमचं माहेरी सोडल्याचं देखील म्हटलं आहे. पतीने जाताना ट्रिपल तलाक दिला. अधिकाऱ्यांनी विवाहितेने दिलेल्या माहितीनुसार, पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याचं म्हटलं आहे. तसेच पोलीस देखील अधिक तपास करत असल्याची माहिती दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

नात्याला काळीमा! 'बाबांनीच आईला खूप मारलं'; 3 वर्षांच्या चिमुकल्याने सांगितलं नेमकं काय घडलं? 

देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. तीन वर्षांच्या चिमुकल्याच्या डोळ्यासमोर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यानेच नेमक काय घडलं याची माहिती पोलिसांना दिली आहे. मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. एका महिलेच्या हत्येचा तपास पोलीस करत असताना या तीन वर्षांच्या मुलाने आपल्या आईसोबत काय घडलं, याची माहिती पोलिसांना दिली आणि आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आलं. तीन वर्षांच्या छोट्या मुलाने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी हत्येचा सुगावा लावला आहे. तपासादरम्यान, हत्या झालेल्या महिलेच्या मुलाशी पोलीस बोलले तेव्हा त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली. आपल्या वडिलांनीच आईला मारल्याचं म्हटलं आहे. 

Web Title: Crime News dowry case teen talaq divorces fir against 6 person including husband