Crime News: खोलीत रक्तबंबाळ अवस्थेत सापडले दीर-वहिनी, तरुणाच्या प्रायव्हेट पार्टमधून येत होतं रक्त, धक्कादायक माहिती आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 16:38 IST2022-03-08T16:38:01+5:302022-03-08T16:38:39+5:30
Crime News: उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका महिलेने तिच्या दिराच्या प्रायव्हेट पार्टचा चावा घेतला. त्यामुळे दीर रक्तबंबाळ झाला. त्यानंतर या महिलेने स्वत:चा हातही चाकूने कापून घेतला.

Crime News: खोलीत रक्तबंबाळ अवस्थेत सापडले दीर-वहिनी, तरुणाच्या प्रायव्हेट पार्टमधून येत होतं रक्त, धक्कादायक माहिती आली समोर
लखनौ - उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका महिलेने तिच्या दिराच्या प्रायव्हेट पार्टचा चावा घेतला. त्यामुळे दीर रक्तबंबाळ झाला. त्यानंतर या महिलेने स्वत:चा हातही चाकूने कापून घेतला. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. या प्रकारामुळे संपूर्ण खोलीत रक्त पसरले होते. दरम्यान, या प्रकाराची माहिती नातेवाईंकांना मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही सीएचसी रुग्णालयात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचारांनंतर डॉक्टरांनी त्यांना हेलट रुग्णालयात अधिक उपचारांसाठी पाठवले.
ही घटना कानपूरमधील बिल्होर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील गावात घडली आहे. या गावात राहणाऱ्या एका तरुणाचा चार वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहनंतर या तरुणाची मानसिक स्थिती बिघडली. अशा परिस्थितीत या नवविवाहितेचे पती आणि कुटुंबीयांसोबत भांडण होऊ लागले. दरम्यान, ग्रामस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार यादरम्यान, सदर महिला आणि तिच्या दिरामध्ये अनैतिक संबंध निर्माण झावे. काही दिवसांपूर्वी ही महिला आणि तिच्या दिरामध्ये काही गोष्टींवरून मतभेद झाले. त्यामुळे नाराज झालेल्या महिलेने दिराच्या प्रायव्हेट पार्टचा चावा घेतला. त्यानंतर स्वत:चा हातावर चाकूने वार करून घेतले.
यादरम्यान, महिलेच्या सासूने सांगितले की, तिच्या पतीची मानसिक स्थिती ठीक नसल्याने ती दररोज भांडण करायची. तसेच ती संपूर्ण कुटुंबाला खोट्या केसमध्ये अडवण्याची आणि आत्महत्या करण्याची धमकी देत असे. या महिलेच्या सासूने पुढे सांगितले की, ही घटना घडली त्या दिवशी माझा धाकटा मुलगा खोलीत झोपला होता. तेव्हा माझ्या सुनेने त्याच्या प्रायव्हेट पार्टचा चावा घेतला. त्यानंतर स्वत:वरही चाकूने हल्ला करवून घेतला. दरम्यान, एसआय विमल प्रकाश यांनी सांगितले की, तक्रार मिळाल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल. तसेच दोघांनाही उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केला जाईल.