Crime News: गणेशोत्सवाचा बॅनर फाडणाऱ्या शिवसैनिकावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 03:29 IST2022-09-02T03:28:51+5:302022-09-02T03:29:36+5:30
Crime News: अंबरनाथच्या चिंचपाडा परिसरात मंगळवारी सायंकाळी गणेशोत्सवाचा बॅनर फाडून त्या बॅनरला लाथा मारणाऱ्या शिवसैनिकाविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला ताब्यात घेऊन नोटीस बजावली आहे.

Crime News: गणेशोत्सवाचा बॅनर फाडणाऱ्या शिवसैनिकावर गुन्हा
अंबरनाथ: अंबरनाथच्या चिंचपाडा परिसरात मंगळवारी सायंकाळी गणेशोत्सवाचा बॅनर फाडून त्या बॅनरला लाथा मारणाऱ्या शिवसैनिकाविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला ताब्यात घेऊन नोटीस बजावली आहे.
अंबरनाथ येथील चिंचपाडा परिसरात राहणाऱ्या विकास सोमेश्वर या शिवसैनिकाने परिसरात एका मंडळाने लावलेला बॅनर काढून त्या बॅनरला लाथ मारल्याने या परिसरातील नागरिकांच्या भावना दुखावल्या होत्या. बॅनरला लाथ मारण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोमेश्वर याच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी अंबरनाथ मधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये गर्दी केली होती. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनच्या बाहेर जाणार नाही अशी ठाम भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली. पोलीस ठाण्याच्या बाहेर वातावरण तंग झाल्याने जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.
अखेर अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याने सोमेश्वर याच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.