crime News: आठ लग्ने करणारी लुटारू नवरी निघाली एड्सबाधित, फसवणूक झालेल्या तरुणांची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 01:16 PM2021-09-02T13:16:45+5:302021-09-02T13:19:03+5:30

Crime News: पोलिसांनी आठ लग्ने करून सासरच्यांकडील दागदागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार होणाऱ्या एका लुटारू नवरीसह चार जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आता या नवरीने केलेल्या गौप्यस्फोटामुळे पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे.

crime News: The bride who performed eight marriages has gone AIDS-infected | crime News: आठ लग्ने करणारी लुटारू नवरी निघाली एड्सबाधित, फसवणूक झालेल्या तरुणांची चिंता वाढली

crime News: आठ लग्ने करणारी लुटारू नवरी निघाली एड्सबाधित, फसवणूक झालेल्या तरुणांची चिंता वाढली

googlenewsNext

नवी दिल्ली - पंजाबमधील पटियाला जिल्ह्यामध्ये पोलिसांनी आठ लग्ने करून सासरच्यांकडील दागदागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार होणाऱ्या एका लुटारू नवरीसह चार जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Crime News) आता या नवरीने केलेल्या गौप्यस्फोटामुळे पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे. आठवडाभरापूर्वी पोलिसाांनी या लुटारू नवरीची एचआयव्ही चाचणी केली होती. त्यामध्ये या महिलेचा रिपोर्ट एचआयव्ही पॉझिटिव्ह आला आहे. आता पोलीस या नवरीसोबत लग्न करणाऱ्या नवऱ्यांचीही चाचणी घेणार आहेत. (The bride who performed eight marriages has gone AIDS-infected )

या तरुणीने आपल्यासोबत तीन तरुणांना घेऊन एक टोळी बनवली होती. ही टोळी लग्नासाठी इच्छुक असलेल्या तरुणांची फसवणूक करत असे. लग्न झाल्यावर संबंधित वर आणि त्याच्या कुटुंबावर मारहाण आणि हुंड्याची मागणी केल्याचा आरोप करून ही तरुणी पंचायत बोलावत असे. तसेच त्यात निवाडा झाल्यावर संधी साधून सासरच्या कुटुंबातील दागदागिने आणि रोख रक्कम घेऊन फरार होत असे. या कामामध्ये या तरुणीची आईही तिला मदत करत असे. या तरुणीकडून फसवणूक झालेल्या ८ जणांपैकी तिघे हे हरियाणामधील आहेत. पटियालामधील जुलका परिसरात नवव्या वराचा शोध घेत असताना ती पोलिसांच्या तावडीत सापडली. या तरुणीने जिथे लग्न केलं, तिथे ती आठवडाभर राहून आलेली आहे. त्यामुळे तिच्याशी विवाह केलेल्या तरुणांवही एड्सचे सावट वाढले आहे.

आरोपी तरुणी ही हरियाणामधील कैथल जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिचे वय ३० वर्षे आहे. तिचा खरा विवाह २०१० मध्ये पटियालामध्ये झाला होता. त्यातून तिला तीन मुगले झाले. त्यांचे वय सात ते नऊ वर्षांदरम्यान आहे. त्यानंतर तिचा पती बेपत्ता झाला होता. मात्र तिने पतीपासून घटस्फोट घेतला नाही. त्यानंतर चार वर्षांपूर्वी तिने विवाह करून फसवणूक करण्याचा धंदा सुरू केला. ती पंजाब आणि हरियाणामधील अविवाहित, घटस्फोटित आणि विधुरांना शोधून फसवण्याचा धंदा सुरू केला. दरम्यान, आठ विवाह करून फसवणूक केल्यानंतर ही तरुणी नववा विवाह करण्याच्या तयारीत होती. त्याचवेळी ती पोलिसांच्या जाळ्यात सापडली.  

Web Title: crime News: The bride who performed eight marriages has gone AIDS-infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.