भयंकर! ...म्हणून 'त्याने' प्रेयसीची केली हत्या; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 22:38 IST2021-05-18T22:36:15+5:302021-05-18T22:38:35+5:30

Crime News : तरुणीच्या हत्येमागे तिचा प्रियकरच असल्याचे बीकेसी पोलिसांच्या कारवाईतून उघड़कीस आले आहे.

Crime News Boyfriend murdered his own girlfriend in mumbai | भयंकर! ...म्हणून 'त्याने' प्रेयसीची केली हत्या; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

भयंकर! ...म्हणून 'त्याने' प्रेयसीची केली हत्या; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

मुंबई - बीकेसी येथे सापडलेल्या तरुणीच्या हत्येमागे तिचा प्रियकरच असल्याचे बीकेसी पोलिसांच्या कारवाईतून उघड़कीस आले आहे. यात, प्रेयसी पूर्ण पगार हातात न दिल्यास बलात्काराच्या गुह्यांत अडकविण्याची भीती घालत असल्यामुळे त्याने तिचा काटा काढल्याचे तपासात समोर आले आहे. मोह्हमद जलील मोह्हमद कलीम शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यात हत्या करण्यात आलेली तरुणी वेश्या व्यवसाय करत होती. शेखने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी त्याच्याकडे पूर्ण पगार हाती देण्यासाठी धमकावत होती. तिच्या रोजच्या धमकीला कंटाळून त्याने तिच्या हत्येचा कट आखला. त्याने तरुणीला फिरण्यासाठी बीकेसी परिसरात नेले. तेथे दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालवल्यानंतर शेख सोबत आणलेल्या चाक़ूने तिच्या गळ्यावर वार करत हत्या केली. त्यानंतर जवळील नाल्यात मृतदेह फेकून तो पळून गेला.

११ मे रोजी  बीकेसी भागात मृतदेह मिळताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीतून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. परिसरातील ६५ हून अधिक सीसीटीव्हीचा शोध घेतला. ८० हून अधिक जणांचे जबाब नोंदविले. त्यादरम्यान शेखबाबत पोलिसांना माहिती मिळाली. तो उत्तरप्रदेशचा रहिवासी असून त्याला हत्येच्या गुह्यांत अटक केली आहे. 
 

Web Title: Crime News Boyfriend murdered his own girlfriend in mumbai