संतापजनक! भाजपा नेत्याची गुंडगिरी; महिलेला केली शिवीगाळ अन् धक्काबुक्की, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 10:06 IST2022-08-06T09:57:39+5:302022-08-06T10:06:53+5:30

Crime News : श्रीकांत त्यागी असं या नेत्याचं नाव असून तो भाजपाच्या किसान मोर्चाचा नेता आहे. सोसायटीमधील पार्कवर अवैधरित्या कब्जा केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

Crime News bjp leader shrikant tyagi abused woman pushed her in noida video viral | संतापजनक! भाजपा नेत्याची गुंडगिरी; महिलेला केली शिवीगाळ अन् धक्काबुक्की, Video व्हायरल

फोटो - आजतक

नवी दिल्ली - भाजपा नेत्याची गुंडगिरी आता समोर आली आहे. एका महिलेला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या नेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्यामध्ये तो महिलेला अपशब्द बोलताना दिसत आहे. तसेच धक्काही मारतो. तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी आपल्या फोनमध्ये हा भयंकर प्रकार रेकॉर्ड केला आहे. नोएडाच्या सेक्टर 93 बी येथील ग्रँड ओमेक्स सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत त्यागी असं या नेत्याचं नाव असून तो भाजपाच्या किसान मोर्चाचा नेता आहे. सोसायटीमधील पार्कवर अवैधरित्या कब्जा केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ज्यामुळे सोसायटीच्या लोकांनी अनेकदा तक्रार केली आहे. तसेच श्रीकांतला 15 दिवसाची एक नोटीस देखील देण्यात आली आहे. पण तरीही स्वत:ला मोठा नेता समजून त्याने सोसायटीमधील लोकांवर दादागिरी केली आहे. 

पार्कवर केलेल्या अवैध कब्जासंदर्भात सोसायटीतील एका महिलेने श्रीकांत त्यागीला जाब विचारला. तेव्हा त्याने महिलेला शिवीगाळ केला. तसेच महिलेने जेव्हा त्याला कडाडून विरोध केला. तेव्हा त्याने तिला जोराचा धक्का दिला आणि मारण्याचा देखील प्रयत्न केला. या घटनेने एकच खळबळ उडाली. सोशल मीडियावर हा व्हि़डीओ जोरदार व्हायरल झाल्यावर नोएडा पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News bjp leader shrikant tyagi abused woman pushed her in noida video viral