संतापजनक! जन्मदात्यानेच केली 3 महिन्यांच्या चिमुकलीची एका आठवड्यात तब्बल 10 वेळा विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 12:38 PM2022-03-30T12:38:48+5:302022-03-30T12:40:40+5:30

Crime News : तीन महिन्यांच्या चिमुकलीची एका आठवड्यात तब्बल 10 वेळा विक्री झाल्याची धक्कादायक घटना घडली.

Crime News Baby girl sold 10 times within a week | संतापजनक! जन्मदात्यानेच केली 3 महिन्यांच्या चिमुकलीची एका आठवड्यात तब्बल 10 वेळा विक्री

संतापजनक! जन्मदात्यानेच केली 3 महिन्यांच्या चिमुकलीची एका आठवड्यात तब्बल 10 वेळा विक्री

Next

नवी दिल्ली - आंध्र प्रदेशमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. मंगळागिरी येथील एका तीन महिन्यांच्या चिमुकलीची एका आठवड्यात तब्बल 10 वेळा विक्री झाल्याची धक्कादायक घटना घडली. या बाळाला आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील विविध लोकांना विकण्यात आलं होतं. अखेर पोलिसांनी पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एका व्यक्तीकडून या मुलीची सुटका केली आणि तिला तिच्या आईकडे सोपवण्यात आलं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गनालाईहपेट येथे एम. मनोज हा व्यक्ती रोजंदारीवर काम करतो. 

मनोजला तीन मुली असून त्याला दारू पिण्याचंही व्यसन आहे. तीन मुलींचा सांभाळ करणं कठीण जात असल्याने त्याने आपल्या सर्वांत लहान मुलीला विकण्याचा निर्णय घेतला. त्याने सुरुवातीला आपलं तीन महिन्यांचं बाळ नागलक्ष्मी नावाच्या महिलेमार्फत नालगोंडा येथील गायत्री नावाच्या एका महिलेला विकलं. तीन महिन्यांच्या मुलीच्या बदल्यात मनोजला 70 हजार रुपये मिळाले होते. मुलीच्या आजीने बाळ बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. बाळाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकं तयार केली होती.

मंगळागिरीचे डीएसपी जे. रामबाबू यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. व्ही. रमेश हे बाळाला विकत घेणारे शेवटचे व्यक्ती होते. त्यांनी 2.50 लाख रुपयांना बाळ विकत घेतलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडिलांसह 11 जणांना अटक केली आहे. त्यात नागलक्ष्मी, गायत्री, बी. नंदू, बी. बाला वर्धी राजू नाईक, एस.के. नूरजहाँ, ए. उदय किरण, बी. उमादेवी, पी. श्रावणी, जी. विजयालक्ष्मी आणि व्ही. रमेश इत्यादींचा समावेश आहे. 

अटक केलेल्या सर्व आरोपींच्या विरोधात आयपीसी कलम 372 आणि बाल न्याय कायदा, 2015 (Juvenile Justice Act) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या आईला तिच्या बाळाची विक्री झाल्याची माहिती होती. तिला मनोजने धमकी दिल्यानं ती गप्प होती. मात्र, तिचा या गुन्ह्यात सहभाग नव्हता. द न्यू इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
 

Web Title: Crime News Baby girl sold 10 times within a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.