भयंकर! डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येने खळबळ; कागदावर तब्बल 200 वेळा लिहिलं 'आशिष LOVE वैशाली'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 20:31 IST2021-10-19T20:27:36+5:302021-10-19T20:31:42+5:30
Crime News : डॉक्टर तरुणीने टोकाचा निर्णय घेतल्याने सर्वांनाचा मोठा धक्का बसला आहे. मात्र आत्महत्येआधी तिने एका कागदावर तब्बल 200 वेळा 'आशिष LOVE वैशाली' असं लिहिलं होतं.

भयंकर! डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येने खळबळ; कागदावर तब्बल 200 वेळा लिहिलं 'आशिष LOVE वैशाली'
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये एका मेडिकल विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. डॉक्टर तरुणीने टोकाचा निर्णय घेतल्याने सर्वांनाचा मोठा धक्का बसला आहे. मात्र आत्महत्येआधी तिने एका कागदावर तब्बल 200 वेळा 'आशिष LOVE वैशाली' असं लिहिलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरादाबादमधील तीर्थंकर महावीर विद्यापीठातील मेडिकल विद्यार्थिनी डॉ. वैशाली चौधरी हिने तिच्या हॉस्टेल रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर पोलिसांना तिच्या खोलीत एक कागद सापडला. या कागदावर जवळपास 200 वेळा "आशिष लव्ह वैशाली" असं लिहिलं होतं. त्यावरून पोलिसांनी आशिषचा शोध घेतला असता त्यांना वैशालीच्या प्रेमप्रकरणाचा शोध लागला. डॉ. आशिष जाखड आणि वैशाली हे एमबीबीएसचं एकत्र शिक्षण घेत होते. या काळात त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं. दोघांनी एकमेकांशी लग्न कऱण्याचाही निर्णय घेतला.
आत्महत्या करून जीवन संपवलं
MBBS पूर्ण झाल्यानंतर मात्र डॉ. आशिष दिल्लीला निघून गेला. दिल्लीला गेल्यानंतर आशिष आपलं वचन विसरला, अशी वैशालीची तक्रार होती. या मुद्द्यावरून ती अनेकदा आशिषला भेटायचा प्रयत्न करत होती, मात्र आशिष ते टाळत असल्याचं सांगितलं जातं. यामुळे ती काही काळ तणावात देखील होती. यातूनच तिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्येच्या आदल्या रात्री वैशाली हॉस्टेलमध्ये आली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी रूमवर आल्यानंतर तिने गळफास लावून आपलं आयुष्य संपवलं.
समर्थ जोहरी या आणखी एका डॉक्टरचंही नाव
पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. डॉ. आशिष जाखडचे वडील हे CRPF मध्ये इंस्पेक्टर होते. या आत्महत्या प्रकरणात समर्थ जौहरी या आणखी एका डॉक्टरचंही नाव आलं आहे. डॉ. समर्थ हा वैशाली आणि आशिष यांचा मित्र असल्याचं समजतं आहे. आशिष आणि समर्थ यांनीच असं काहीतरी केलं, ज्यामुळे आपली मुलगी बेचैन होती, असा दावा वैशालीच्या वडिलांनी केला आहे. त्यामुळे त्या दिशेने देखील पोलिसांना चौकशी सुरू केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.