Crime News: महिलेची छेड काढून आरोपी फरार; काही दिवसानंतर परतला, गावकऱ्यांनी झाडाला बांधून चोपले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 14:37 IST2022-06-20T14:36:52+5:302022-06-20T14:37:00+5:30
Rajasthan Crime News: काही दिवसांपूर्वी आरोपी गावात चोरी करताना सापडला होता, तेव्हा समज देऊन त्याला सोडले होते.

Crime News: महिलेची छेड काढून आरोपी फरार; काही दिवसानंतर परतला, गावकऱ्यांनी झाडाला बांधून चोपले
Rajasthan Crime News: देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोज समोर येत आहेत. गुन्हेगार पकडले जात असले तरी लोकांच्या मनात कायद्याचा धाक राहिलेला नाही. कदाचित याच कारणामुळे महिलांची छेडछाड काढण्याचे सत्र थांबत नाही. राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यात असेच एक प्रकरण समोर आले आहे. गावातील महिलेचा विनयभंग करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. संतत्प गावकऱ्यांनी आरोपीला झाडाला बांधून बेदम मारहाण केली.
आरोपीला झाडाला बांधून चोपले
प्रकरण अजमेर जिल्ह्यातील सावर पोलीस स्टेशन हद्दीतील मेहरू कलान गावातील आहे. आठवडाभरापूर्वी राकेश रायगर या तरुणाने गावातील शेतात कामाला जाणाऱ्या महिलेचा विनयभंग केला होता. महिलेने आरडाओरड करताच आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला. यानंतर पीडितेने पोलिस ठाण्यात जाऊन आरोपीविरुद्ध पोलिसांत तक्रारही दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. रविवारी आरोपी गावात अचानक दिसल्यावर गावकऱ्यांनी त्याला पकडून झाडाला बांधून बेदम मारहाण केली.
आरोपीने यापूर्वी चोरी केली होती
या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एसएचओ आशुतोष पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राकेश रायगरवर काही दिवसांपूर्वी एका महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता, तेव्हापासून आरोपी गावातून फरार होता. गावी परतल्यावर गावकऱ्यांनी त्याला पकडले. शांतता भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली. यापूर्वीही गावात चोरी करताना तो पकडला गेला होता. त्यावेळी समज देऊन लोकांनी त्याला सोडले होते.