"आता खूश राहा, तुमच्या रस्त्यातील काटा बाजुला झालाय"; सुसाईड नोट लिहून महिलेची मुलासह आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 05:30 PM2021-09-28T17:30:38+5:302021-09-28T17:37:45+5:30

Crime News : तीन वर्षांच्या लेकासह 7 महिन्यांच्या गर्भवतीने टोकाचं पाऊल उचललं आहे. गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Crime News 3 year old son 7 month old pregnant mother also hanged both died wrote in suicide note | "आता खूश राहा, तुमच्या रस्त्यातील काटा बाजुला झालाय"; सुसाईड नोट लिहून महिलेची मुलासह आत्महत्या

"आता खूश राहा, तुमच्या रस्त्यातील काटा बाजुला झालाय"; सुसाईड नोट लिहून महिलेची मुलासह आत्महत्या

Next

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना आता समोर आली आहे. तीन वर्षांच्या लेकासह 7 महिन्यांच्या गर्भवतीने टोकाचं पाऊल उचललं आहे. गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाच पानी सुसाईड नोटमधून हा खुलासा करण्यात आला आहे. "आता खूश राहा, तुमच्या रस्त्यातील काटा बाजुला झाला आहे" असं म्हणत विवाहितेने आत्महत्या केली आहे. तसेच सासरच्या मंडळींवर देखील गंभीर आरोप केले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुरैना भागात राहणाऱ्या 28 वर्षीय प्रीती प्रजापतीचं काही वर्षांपूर्वी ग्वाल्हेरमध्ये राहणाऱ्या राजकुमारसोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर काही महिने सर्व काही ठीक होतं. पण नंतर राजकुमारला जुगार आणि दारूचं व्यसन लागलं. यामुळेच तो आपल्या पत्नीला मारहाण करत असे. याच दरम्यान तीन वर्षांपूर्वी पहिला मुलगा झाला. कुणाल असं त्याचं नाव ठेवण्यात आलं. पण मुलाच्या जन्मानंतर सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी दबाव आणण्यात आला. माहेराहून पैसे घेऊन ये असं सांगण्यात येऊ लागलं. प्रीताचा छळ करण्यात आला. 

3 वर्षांच्या लेकासह 7 महिन्यांच्या गर्भवतीने टोकाचं पाऊल उचललं

प्रीतीने आत्महत्येआधी एक पाच पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. यामध्ये तिने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची, मानसिक छळाची माहिती दिली आहे. तसेच "आपल्या मृत्यूसाठी पती, सासू, दीर यांना जबाबदार धरलं आहे. मी खूप दु:खी झाले आहे. लग्न झालं तेव्हा खूप स्वप्न होती. सुरुवातीला सर्व ठीक होतं पण नंतर नवऱ्याला दारुचं व्यसन लागलं आणि माझं आयुष्य नरक झालं. त्यामुळेच मी आणि माझा मुलगा जीव देत आहोत. आता तुम्ही खूश राहा, तुमच्या रस्त्यातला काटा बाजुला झाला आहे" असं प्रीतीने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. 

प्रीतीच्या आईने सासरच्या मंडळींवर केले गंभीर आरोप 

प्रीती सात महिन्यांची गर्भवती होती. याच दरम्यान पती कामावर गेले असताना आणि घरामध्ये कोणी नसताना तिने आपल्या तीन वर्षांच्या चिमुकल्यासंह गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजारी राहणाऱ्या महिलेने पोलिसांना याबाबत माहिती दिली. मुलीच्या मृत्यूची माहिती मिळताच प्रीतीचे आई-वडील आणि भाऊ घरी आले. प्रीतीच्या आईने सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. सासरच्या लोकांनीच आपल्या मुलीची आणि तिच्या लेकाची हत्या केल्याचं म्हटलं आहे. तसेच मुलीला त्रास देत असल्याचंही सांगितलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

English summary :
Crime News 3 year old son 7 month old pregnant mother also hanged both died wrote in suicide note

Web Title: Crime News 3 year old son 7 month old pregnant mother also hanged both died wrote in suicide note

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app