शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

इन्स्टाग्रामवर ओळख मग मैत्री आणि नंतर अपहरण; पोलिसांनी अशी केली 13 वर्षीय मुलीची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 5:11 PM

Crime News : अल्पवयीन मुलगी आपल्या आईचा मोबाईल वापरत होती. त्यामुळे आता सोशल मीडियाचा होणारा वापर हा आजच्या घडीला घातक ठरत असल्याचचं वारंवार समोर आलं आहे. 

मयुरी चव्हाण  डोंबिवली - डोंबिवलीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना गुरुवारी समोर आली असताना सोमवारी पुन्हा डोंबिवलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने आधी 13 वर्षीय मुलीशी इन्स्टाग्रामवर ओळख केली. त्यानंतर हळूहळू तिच्याशी मैत्री केली. तिला विश्वासात घेत फूस लावून तिचे अपहरण करण्यात आले. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी महत्वाची भूमिका बजावली असून आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही अल्पवयीन मुलगी आपल्या आईचा मोबाईल वापरत होती. त्यामुळे आता सोशल मीडियाचा होणारा वापर हा आजच्या घडीला घातक ठरत असल्याचचं वारंवार समोर आलं आहे. 

अक्षय महाडिक असं या आरोपीच नाव असून खाजगी गुप्तहेराच्या मदतीने त्याला ठाणे येथून अटक करण्यात आली आहे. 20 सप्टेंबर रोजी, ही मुलगी क्लासला जाते अस सांगून घराबाहेर पडली ती पुन्हा आलीच नाही. शोधाशोध करूनही मुलीचा काहीच पत्ता लागत नसल्याने मुलीच्या पालकांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता अक्षय महाडिक या तरुणानेच मुलीचं अपहरण केलं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अक्षयने तिला काल्हेर येथे एका फ्लॅट मध्ये कोंडून ठेवलं होतं. पोलिसांनी मुलीची सुटका करत सुखरूपपणे तिला आपल्या पालकांच्या स्वाधीन केलं आहे. 

अक्षयने आपला गुन्हा कबुल केला असून त्याच्यावर अपहरण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगी ही आपल्या आईच्या मोबाईलवरून इंस्टाग्राम या सोशल साईटवर एक्टिव्ह होती. या माध्यमातूनच तिची अक्षयसोबत ओळख झाली आणि त्यानंतर फूस लावून अक्षयने तिचं अपहरण केलं. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस  ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव, पोलीस निरीक्षक मोहन खंदारे, पोलीस उपनिरीक्षक घनश्याम बेंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वडणे यांनी महत्वाची भूमिका बजावत 3 दिवसांत अटक केली आहे. सामूहिक बलात्काराची  घटना असो किंवा विनयभंगाची घटना यामध्ये सोशल मीडियाचा गैरवापर हा समोर आला आहे. ऑनलाईन शिक्षण घेत असताना आता  मुलांच्या बाजूला बसून त्यांच्यावर लक्ष  ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :kalyanकल्याणInstagramइन्स्टाग्रामPoliceपोलिसArrestअटक