Crime Newe: धारदार हत्याराने सपासप वार, पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 09:24 IST2022-06-27T09:24:26+5:302022-06-27T09:24:43+5:30

Crime Nrws: पतीनेच पत्नीचा धारदार हत्याराने खून केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. संगीता सचिन पवार असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

Crime Newe: Husband stabs wife to death | Crime Newe: धारदार हत्याराने सपासप वार, पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

Crime Newe: धारदार हत्याराने सपासप वार, पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

नाशिक - अंबड येथील चुंचाळे भागात पतीनेच पत्नीचा धारदार हत्याराने खून केल्याची घटना सोमवारी (दि.२७) सकाळी उघडकीस आली. संगीता सचिन पवार (22,मूळ वाळुंज एम आयडीसी, औरंगाबाद, हल्ली रा.चुंचाळे, नाशिक) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

 गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वीच औरंगाबाद वाळूज  एमआयडीसी येथून अंबड येथील चूचाळे येथे भाड्याने रूम घेऊन पती सचिन पवार हा पत्नी संगीता व दोन वर्षाची मुलगी स्वरा यांच्याबरोबर राहण्यासाठी आले होते. रविवारी दुपारच्या सुमारास पती संशयित  सचिन पवार याने संगीता हिच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला. तसेच खून केल्यानंतर सचिन पवार हा घराचे लॉक लावून औरंगाबाद येथे निघून गेला. पवार यांनीच औरंगाबाद येथील पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर अंबड पोलिसांना तेथून  माहिती मिळताच पोलिसांनी रात्री येथील त्यांच्या घरात जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. सचिन पवार यानेच पत्नीचा खून झाल्याची माहिती औरंगाबाद येथील पोलिसांना कळवली. पोलिसांनी संशयित सचिन पवार यास ताब्यात घेतले असून अंबड पोलीस सचिन पवारला ताब्यात घेण्यासाठी औरंगाबाद एमआयडीसी येथील पोलीस ठाण्यात रवाना झाले आहेत.

Web Title: Crime Newe: Husband stabs wife to death