Crime: धक्कादायक प्रकार; नापास विद्यार्थ्यांची शिक्षकासह तिघांना झाडाला बांधून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 07:34 IST2022-09-01T07:33:38+5:302022-09-01T07:34:14+5:30

Crime News: झारखंडमधील दुमका येथे एका शाळेत नववीच्या इयत्तेत शिकणाऱ्या व परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकासहित तिघांना झाडाला बांधले व त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेची चौकशी करण्याचा निर्णय दुमका येथील प्रशासनाने घेतला आहे. 

Crime: failed students Catch teacher and beaten | Crime: धक्कादायक प्रकार; नापास विद्यार्थ्यांची शिक्षकासह तिघांना झाडाला बांधून मारहाण

Crime: धक्कादायक प्रकार; नापास विद्यार्थ्यांची शिक्षकासह तिघांना झाडाला बांधून मारहाण

रांची : झारखंडमधील दुमका येथे एका शाळेत नववीच्या इयत्तेत शिकणाऱ्या व परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकासहित तिघांना झाडाला बांधले व त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेची चौकशी करण्याचा निर्णय दुमका येथील प्रशासनाने घेतला आहे. 
शिक्षकांनी जाणूनबुजून कमी गुण दिल्याने आम्ही नापास झालो, असा या विद्यार्थ्यांचा आरोप आहे. विद्यार्थ्यांनी एक शिक्षक, शिपाई व क्लार्क यांना दोरीने आंब्याच्या झाडाला बांधले व बेदम मारहाण केली. या घटनेचे त्यांनी फेसबुक लाइव्ह केले. (वृत्तसंस्था) 

उत्तरपत्रिका पाहण्यास मागितल्या
नापास ११ विद्यार्थ्यांनी शिक्षक कुमार सुमान, क्लार्क सोनेराम चौडे यांना प्रॅक्टिकल परीक्षेच्या उत्तरपत्रिका पाहण्यास मागितल्या; पण त्यास नकार देताच विद्यार्थी प्रचंड संतापले. 

रोखण्यासाठी गेलेल्यांनाही मारले
विद्यार्थ्यांनी शिक्षक व क्लार्कला झाडाला बांधून लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरु केली. रोखण्यासाठी शाळेतील शिपाई अचंतू मल्लिक हे धावून गेले; तर त्यांनाही विद्यार्थ्यांनी मारहाण केली. शिक्षक, क्लार्क, शिपाई या तिघांना झाडाला बांधून मारले. शिक्षकाने विनंती करताच या तिघांना सोडून दिले. 

Web Title: Crime: failed students Catch teacher and beaten