गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगार शिवा शेट्टीला केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 23:53 IST2019-01-16T23:52:49+5:302019-01-16T23:53:37+5:30

गोरेगाव येथील आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या फिल्म सिटीमध्ये मोठंमोठे सेट उभारण्यासाठी लागणाऱ्या कामगारांचे कंत्राट आपल्याला मिळविण्यासाठी धमकाविणे आणि खंडणीची मागणी करणे आणि चोरीचे अनेक गुन्हे असलेल्या शिवा शेट्टीविरोधात आरे पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या.

Crime Branch arrested criminal Shiva Shetty | गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगार शिवा शेट्टीला केली अटक

गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगार शिवा शेट्टीला केली अटक

मुंबई - गुन्हे शाखेच्या कक्ष 12 ने सराईत गुन्हेगार शिवा शेट्टीला अखेर बेड्या ठोकल्या आहेत. याआधी आरे पोलिसांनी खंडणी प्रकरणी सराईत गुन्हेगार शिवा शेट्टीला अटक केली होती. गोरेगाव पोलीस ठाण्यात शेट्टीविरोधात एक गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात शिवा शेट्टी वॉन्टेड होता.

शिवा शेट्टीविरोधात महाराष्ट्र, दमण आणि गुजरातमध्ये जवळपास ३० चोरीचे गुन्हे आहे. गोरेगाव येथील आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या फिल्म सिटीमध्ये मोठंमोठे सेट उभारण्यासाठी लागणाऱ्या कामगारांचे कंत्राट आपल्याला मिळविण्यासाठी धमकाविणे आणि खंडणीची मागणी करणे आणि चोरीचे अनेक गुन्हे असलेल्या शिवा शेट्टीविरोधात आरे पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. मात्र, अनेक दिवस उलटले तरी कारवाई होत नसल्याने तक्रारदार पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांना भेटले होते. त्यानंतर आज शिवा या सराईत चोराला आणि गुन्हेगाराला पोलिसांनीअटक केली होती. आरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बेल्हे यांनी ही कारवाई करत शिवाला बेड्या ठोकल्या होत्या.

Web Title: Crime Branch arrested criminal Shiva Shetty