शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
3
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
4
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
5
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
6
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
7
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
9
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
10
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
11
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
12
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
13
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
14
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
15
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
16
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
17
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
18
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
19
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
20
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!

लाचप्रकरणी वाशिमच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 3:50 PM

वाशिम - तक्रारदाराच्या नातेवाईकाविरूद्ध दाखल गुन्हयात जमानत देण्याच्या नावाखाली लाचेची मागणी करणाऱ्या वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फ १७ जुलै रोजी गुन्हा दाखल.

ठळक मुद्दे नितीन मनोहर काळे व विष्णू भगवान बोंडे अशी कर्मचाऱ्यांची नावे आहेत.तक्रारदाराच्या नातेवाईकांविरूद्ध वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात जमानत देण्याकरिता लाचेची मागणी. मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने २९ जून रोजी शिवाजी चौकातील पोलीस चौकी येथे सापळा रचण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - तक्रारदाराच्या नातेवाईकाविरूद्ध दाखल गुन्हयात जमानत देण्याच्या नावाखाली लाचेची मागणी करणाऱ्या वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फ १७ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नितीन मनोहर काळे व विष्णू भगवान बोंडे अशी कर्मचाऱ्यांची नावे आहेत.तक्रारदाराच्या नातेवाईकांविरूद्ध वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात जमानत देण्याकरिता पोलीस कर्मचारी नितीन काळे व विष्णू बोंडे यांनी आठ हजार रुपये लाचेची मागणी केली होती, अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २८ जून रोजी दाखल झाली होती. पैशाच्या तडजोडीकरिता शिवाजी चौक, पोलीस चौकी वाशिम  येथे तक्रारदाराला बोलाविण्यात आले होते. २८ व २९ जून रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता, आरोपींनी तक्रारदाराकडून पंचासमक्ष तडतोडअंती दोन हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने २९ जून रोजी शिवाजी चौकातील पोलीस चौकी येथे सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपींना तक्रारदाराच्या हालचालीबाबत संशय आल्याने तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्विकारली नाही. याप्रकरणी १७ जुलै रोजी आरोपींविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक आर.व्ही. गांगुर्डे, पोलीस कर्मचारी नंदकिशोर परळकर, दिलीप बेलोकर, विनोद सुर्वे, अरविंद राठोड यांनी पार पाडली.

टॅग्स :washimवाशिमAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग