महिलेचा अश्लील व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर टाकण्याची धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 18:24 IST2018-12-21T18:21:57+5:302018-12-21T18:24:34+5:30

महिलेवर लैंगिक अत्याचार करुन अश्लिल व्हिडिओ तयार केला. याबाबत कोणाला काही सांगितल्यास हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली.

created a women's porn video by criminal on Threat to social media published | महिलेचा अश्लील व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर टाकण्याची धमकी 

महिलेचा अश्लील व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर टाकण्याची धमकी 

पिंपरी : महिलेवर लैंगिक अत्याचार करुन अश्लिल व्हिडिओ तयार केला. याबाबत कोणाला काही सांगितल्यास हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी एकाला अटक केली. 
किरण कृष्णा भालेकर (वय ४२,रा.सोमनाथनगर, वडगाव शेरी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चिखली येथील ३० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित महिलेचे लग्न झाले असून ती एका आयटी कंपनीत कामाला आहे. तिच्या पतीच्या माध्यमातून आरोपीची व फिर्यादी महिलेची ओळख झाली होती. दरम्यान, मोठ्या कॉलेजचे अधिकारी माझ्याकडे येणार असून त्यांच्याकडून आपल्याला आगामी काळात चांगली कामे मिळतील असे आमिष दाखवून आरोपीने पीडित महिलेला डांगे चौकातील एका हॉटेलवर बोलावून घेतले. तसेच माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणत शरीर संबंध ठेवण्याची मागणी केली. यासह संबंध ठेवल्यास मुल होईल असे सांगत महिलेशी जवळीक साधत तिच्या इच्छेविरुद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराचा व्हिडिओ तयार केला. तसेच याबाबत कोणाला काही सांगितल्यास हा सोशल मीडियावर टाकण्याची धमकी व्हिडिओ दिली. यानंतर पीडित महिलेला आरोपीने बराच वेळ हॉटेलच्या खोलीत डांबून ठेवले. याबाबत वाकड ठाण्यात तक्रार दिल्यानंतर भालेकर याला पोलिसांनी अटक केले असून न्यायालयात हजर केले असता २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ए.बी. शेटे करत आहेत. 

Web Title: created a women's porn video by criminal on Threat to social media published