कॉक्स अँड किंग्जच्या प्रवर्तकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 07:55 AM2020-11-27T07:55:12+5:302020-11-27T07:55:36+5:30

ईडीची कारवाई : येस बँक कथित कर्ज घोटाळा प्रकरण

Cox & Kings promoter arrested by ED | कॉक्स अँड किंग्जच्या प्रवर्तकाला अटक

कॉक्स अँड किंग्जच्या प्रवर्तकाला अटक

Next

मुंबई : येस बॅँकेत करण्यात आलेल्या हजारो कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरूवारी जागतिक टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनी असलेल्या कॉक्स आणि किंग्जचे प्रवर्तक पीटर केरकर उर्फ अजय अजीत पीटर यांना रात्री उशिराने 

अटक केली आहे. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

        येस बँक प्रकरणी दाखल मनी लॉडरिंग प्रकरणात अधिक पुरावे गोळा करण्याच्या उद्देशाने जून महिन्यात कॉक्स अँड किंग्जच्या कार्यालयात छापेमारी करण्यात आली होती. याच प्रकरणात येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांना अटक करण्यात आली असून, याबाबत पहिले आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहेत.  ही बँकेची मोठी कर्जदार कंपनी होती. या कंपनीची ३,६४२  कोटींची थकबाक़ी आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचे मुंबई आणि यूकेमध्ये मुख्यालय आहे. कॉक्स अँड किंग्ज लि.चे कार्य २२ देश आणि ४ खंडांमध्ये पसरले आहे.

       

Web Title: Cox & Kings promoter arrested by ED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.