शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

हापूरमधील पहिलीच घटना! बलात्कार आणि हत्या प्रकरणी कोर्टाने दोषींना सुनावली फाशीची शिक्षा

By पूनम अपराज | Published: October 15, 2020 10:02 PM

Death Sentence : आरोपींनी ही घटना घडवून आणल्यानंतर मुलीचा मृतदेह पेंढाच्या ढीगात लपविला होता.

ठळक मुद्दे हापूर जिल्ह्यातील हे पहिलेच प्रकरण आहे, ज्यात आरोपींना बलात्कारानंतर हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशच्या हापूर जिल्ह्यात २ वर्षांपूर्वी एका १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आणि विशेष न्यायाधीश वीणा नारायण यांनी दोन दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. बलात्कारानंतर मुलीची हत्या करण्यात आली. आरोपींनी ही घटना घडवून आणल्यानंतर मुलीचा मृतदेह पेंढाच्या ढीगात लपविला होता.हत्येला विरोध दर्शवताना आरोपींनी मुलाच्या भावाच्या गळा कापला होता. दोन घरकाम करणाऱ्यांनी ही भीषण घटना घडवून आणली. हापूरच्या अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आणि विशेष न्यायाधीश (पोक्सो कोर्ट) वीणा नारायण यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देताना पीडित कुटुंबीयांमध्ये समाधानी वातावरण पसरले. हापूरच्या पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली.१२ वर्षांच्या निरागस मुलीवर बलात्काराची घटना दोन वर्षापूर्वी हापूर जिल्ह्यातील पोलिस स्टेशन परिसरात घडली होती. घरी घरकाम करणाऱ्या दोन नोकरांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती, जेव्हा मुलीने निषेध केला तेव्हा आरोपीने मुलीची हत्या केली घरात बनवलेल्या पेंढाच्या खोलीत मृत मुलीला पोत्यात लपविले.परंतु या संपूर्ण घटनेची साक्ष मुलीच्या दहा वर्षाच्या भावाने दिली आणि त्यानंतर आरोपीने मुलाच्या दहा वर्षाच्या भावाची गळा कापला होता. तेव्हापासून हे प्रकरण न्यायालयात विचाराधीन होते. या प्रकरणात गुरुवारी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आणि विशेष न्यायाधीश (पोक्सो कोर्ट) वीणा नारायण यांनी दोन्ही आरोपी अंकुर तेली आणि सोनू उर्फ पव्वा यांना फाशीची शिक्षा सुनावली.

एकीकडे उत्तर प्रदेशामध्ये बलात्कारानंतरच्या हत्येची प्रकरणे समोर येत असताना, या प्रकरणात, हापूर कोर्टाच्या विशेष न्यायाधीश वीणा नारायण यांनी मुलीला बलात्कारानंतर खून प्रकरणातील दोन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. हापूर जिल्ह्यातील हे पहिलेच प्रकरण आहे, ज्यात आरोपींना बलात्कारानंतर हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयRapeबलात्कारMurderखूनPoliceपोलिसPOCSO Actपॉक्सो कायदा