शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

अल्पवयीन तरुणीला घेतला चावा, कोर्टानं 11 महिन्यांचा कारावास ठोठावला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 4:08 PM

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ही घटना घडली होती.

ठळक मुद्देगालाला चावा घेतल्याप्रकरणी २१ वर्षीय तरुणाला पॉक्सो कोर्टाने बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पॉक्सो) दोषी ठरवलं आहे. २०१५ साली या तरुणीचे अपहरण करून तिच्याशी जबरदस्तीने लग्न केल्याचा ठपका या दोषी तरुणावर ठेवण्यात आला होता. पॉक्सो कोर्टाने पॉक्सो कायद्यान्वये कलमांतर्गत गुन्ह्यातून त्याला दोषमुक्त केले आहे.

मुंबई - पालक घरी नसताना एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्या गालाला चावा घेतल्याप्रकरणी २१ वर्षीय तरुणाला पॉक्सो कोर्टाने बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पॉक्सो) दोषी ठरवलं आहे. या प्रकरणी त्याला ११ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ही घटना घडली होती.१७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्या गालाला चावा घेतल्याप्रकरणी कोर्टात आरोपीविरोधात विशेष सरकारी वकील गीता शर्मा यांनी चाव्याच्या व्रणाचा ऍनालिसिस रिपोर्टसह ठोस पुरावे सादर केले. सुनावणीदरम्यान वकिलांनी सविस्तर अहवालही सादर केला होता. त्याआधी पीडितेने पोलिसांसमोर जबाबही नोंदवला होता. २०१८ ऑक्टोबरमध्ये ही घटना घडली. त्यावेळी पीडित तरुणी बारावीत शिकत होते आणि आरोपीला ओळखत होती अशी माहिती तिने पोलिसांना दिली होती. पीडितेनं पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार १८ ऑक्टोबर २०१८ रोजी ती घरात एकटीच होती. पालक कौटुंबिक कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी तरुण खोलीत शिरला. त्याने घट्ट मिठीत घेऊन पीडित तरुणीच्या उजव्या गालाचा चावा घेतला. त्यानंतर घाबरलेल्या तरुणीने आरडाओरड केली. पण आरोपीनं तिला सोडलं नाही. बराच वेळ प्रतिकार केल्यानंतर कसाबसा पीडित तरुणीने त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. त्यानंतर, आरोपीनं पळ काढला होता. नंतर दुसऱ्या दिवशी आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी त्याला तुरुंग डांबले होते.याप्रकरणी पॉक्सो कोर्टाने निकाल देत आरोपी तरुणाला ११ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि १ हजार रुपये दंड आकाराला आहे. मात्र, पॉक्सो कोर्टाने पॉक्सो कायद्यान्वये कलमांतर्गत गुन्ह्यातून त्याला दोषमुक्त केले आहे. २०१५ साली या तरुणीचे अपहरण करून तिच्याशी जबरदस्तीने लग्न केल्याचा ठपका या दोषी तरुणावर ठेवण्यात आला होता. त्यावेळी पीडित तरुणीचे वय १५ वर्ष होते.  

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाCourtन्यायालयMumbaiमुंबईKidnappingअपहरण