वैवाहिक आयुष्य सुरु होण्यापूर्वीच सगळं संपले; एकाचवेळी प्रेमी जोडप्यावर अंत्यसंस्कार केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 19:36 IST2021-11-15T19:35:25+5:302021-11-15T19:36:01+5:30

युवक आणि युवतीच्या निधनाची बातमी करताच दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

A couple who went shopping for a wedding died in a road accident at UP | वैवाहिक आयुष्य सुरु होण्यापूर्वीच सगळं संपले; एकाचवेळी प्रेमी जोडप्यावर अंत्यसंस्कार केले

वैवाहिक आयुष्य सुरु होण्यापूर्वीच सगळं संपले; एकाचवेळी प्रेमी जोडप्यावर अंत्यसंस्कार केले

औरैया – उत्तर प्रदेशातील औरेया इथं ह्दयद्रावक घटना घडली आहे. ज्याठिकाणी एका रस्ते अपघातात युवक आणि युवतीचा मृत्यू झाला आहे. १० डिसेंबरला या दोघांचे लग्न होणार होते. लग्नाच्या तयारीसाठी दोघंही खरेदी करायला कानपूरला गेले होते. परंतु घरी परतताना अज्ञात वाहनाने दोघं जात असलेल्या स्कूटीला जोरदार धडक दिली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. युवक आणि युवतीच्या मृत्यूची बातमी कळताच दोन्ही कुटुंबीयांना जबर धक्का बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत सचिन श्रीवास्तव आणि सोनी एकाच परिसरात राहायला होते. दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करायचे. दोघांना एकमेकांसोबत लग्न करायचं होतं म्हणून घरच्यांना सांगून दोघांनी त्यांना लग्नासाठी होकार मिळवला. वेगवेगळ्या जातीतील असल्याने सुरुवातीला दोघांच्या कुटुंबाने लग्नाला विरोध केला परंतु त्यानंतर मुलांच्या प्रयत्नाने ते दोन्ही कुटुंब तयार झाले. सचिन श्रीवास्तव हा सीबीआयमध्ये क्लार्क पदावर तैनात होता. दोघांचा साखरपुडा झाला होता. लग्नाची तयारी सुरु होती. परंतु या दुर्घटनेने आनंदाच्या वातावरणात दुखाचं विरजन पडलं आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच गावकरी हळहळले

युवक आणि युवतीच्या निधनाची बातमी करताच दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. जेव्हा दोघांचे मृतदेह घरी आणले तेव्हा अनेकांच्या अश्रूचा बांध फुटला. नातेवाईकांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानंतर दोघांवर एकत्रच अंत्यसंस्कार करण्यात आले. वैवाहिक आयुष्याची स्वप्न पाहणाऱ्या या दोघांच्या मृत्यूनं सर्व गावकरी हळहळले. पोस्टमोर्टमनंतर पोलिसांनी दोघांचे मृतदेह कुटुंबाला सोपवले होते. या अपघाताची पोलीस चौकशी करत आहेत. अज्ञात वाहनाचा शोध घेतला जात आहे. रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहिले जात आहेत.

Web Title: A couple who went shopping for a wedding died in a road accident at UP