नागपुरातील कळमन्यात बनावट दारूचा कारखाना : पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 11:19 PM2020-02-28T23:19:00+5:302020-02-28T23:20:06+5:30

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कळमन्यातील एका बनावट मद्याच्या कारखान्यावर कळमना पोलिसांनी छापा मारला.

Counterfeit liquor factory in Kalmani in Nagpur: Police raid | नागपुरातील कळमन्यात बनावट दारूचा कारखाना : पोलिसांचा छापा

नागपुरातील कळमन्यात बनावट दारूचा कारखाना : पोलिसांचा छापा

Next
ठळक मुद्देसाडेसात लाखांचे साहित्य जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कळमन्यातील एका बनावट मद्याच्या कारखान्यावर कळमना पोलिसांनी छापा मारला. या छाप्यानंतर पोलिसांनी कारखान्याचा मालक आणि कुख्यात मद्यसम्राट कृष्णा साहेबराव जयस्वाल (वय ४५, रा. कमाल चौक, जयस्वाल बिल्डींग), अभिलाष राजेश जयस्वाल (वय २९, रा. पेन्शननगर, पोलीस लाईन टाकळी) आणि मुन्ना बळीराम भगत (वय ३६, रा. सूरज टाऊनजवळ वाठोडा) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
कृष्णा जयस्वाल हा या बनावट मद्याच्या कारखान्याचा मालक आहे. तो अनेक वर्र्षांपासून मद्याच्या धंद्यात सक्रिय आहे. त्याचा पाचपावलीत बीअरबारही आहे. त्याने कळमना गावात कोल्हे ले-आऊटमध्ये दारूचा कारखाना सुरू केला होता. तो येथे ब्रँण्डेड मद्याच्या बाटलीत कमी दर्जाची दारू भरून ती मशीनने सीलबंद करीत होता. त्यानंतर नकली मद्य विदेशी मद्य म्हणून ढाबे तसेच बीअर बारमध्ये पोहचवून लाखों रुपये कमविण्याच्या तयारीत होता. त्याच्या या कारखान्याची चाहूल लागताच परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली कळमना पोलिसांनी बुधवारी दुपारी छापा घातला. यावेळी पोलिसांना काही वाहने ड्रम, रिकाम्या वेगवेगळ्या ब्रँण्डच्या बाटल्या, खुली झाकणं, रसायन आदीसह ७ लाख, ४१, ४३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार विश्वनाथ चव्हाण, निरीक्षक नितीन फटांगरे, सहायक निरीक्षक उल्हास पवार, हवलदार प्रभाकर आग्रे, रवींद्र आखरे, जयपूरकर, भाऊराव आगरकर, प्रवीण सिंह मोटघरे, गणेश डबरे, मनीष बुरडे, मनीष जरकर, मनोज बहुरूपे आणि अशोक तायडे यांनी बजावली.

चंद्रपुरात जात होते मद्य
कृष्णा जयस्वाल मद्यव्यवसायातील जुना खेळाडू मानला जातो. चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी झाल्यानंतर नागपुरातून तेथे मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जाते. या तस्करीत मद्यतस्करांना काही पोलिसांचीही साथ आहे. वेळोवेळी ते उघडही झाले आहे. वेळोवेळी दारू पकडली जाते आणि चंद्रपूर जिल्ह्यातून प्रचंड प्रमाणात मागणी असल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर बनावट दारू पाठवली जाते. हा कारखाना त्याचसाठी जयस्वालने सुरू केला असावा, असा संशय आहे.

Web Title: Counterfeit liquor factory in Kalmani in Nagpur: Police raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.