शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

बनावट कोरोना स्वॅब स्टिकप्रकरणी मनीष केसवानी याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 8:15 PM

Crime News : स्वॅब स्टिक कुठे बनवून वितरित केल्या आदींचा उलघडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देउल्हासनगर खेमानी ज्ञानेश्वरनगर झोपडपट्टीतील काही घरात चक्क कोरोना चाचणीसाठी लागणाऱ्या स्वॅब स्टिकचे पॅकिंग केले जात असल्याचा प्रकार उघड झाल्यावर एकच खळबळ उडाली.

सदानंद नाईक उल्हासनगर : बायोस्वॅब परदेशी कंपनीच्या नावाने बनावट कोरोना चाचणीचे स्वॅब स्टिकचे पॅकिंग करणाऱ्या मनीष केसवानी याला उल्हासनगर पोलीसानी शुक्रवारी अटक केली. स्वॅब स्टिक कुठे बनवून वितरित केल्या आदींचा उलघडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली जात आहे.

उल्हासनगर खेमानी ज्ञानेश्वरनगर झोपडपट्टीतील काही घरात चक्क कोरोना चाचणीसाठी लागणाऱ्या स्वॅब स्टिकचे पॅकिंग केले जात असल्याचा प्रकार उघड झाल्यावर एकच खळबळ उडाली. महापालिकेच्या अतिरिक आयुक्त करुणा जुईकर यांनी याप्रकाराची त्वरित दखल घेत, पोलिसांसह घटनास्थळ गाठून उघड्यावर पैकिंग केलेल्या हजारो स्वब स्टिक ताब्यात घेतल्या. तसेच अन्न औषध व प्रशासन विभागाला याबाबतची माहिती देऊन, कारवाई करण्याचे सुचविले. अन्न औषध व प्रशासन विभागाचे निरीक्षक विलास तासखेडकर यांच्या तक्रारीवरून मनीष केसवानी यांच्या विरोधात उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शुक्रवारी मनीष केसवानी याला अटक केली असून स्वॅब स्टिक बनविणारे व स्टिकचे वितरण कुठे कुठे केले. याबाबचा खुलासा उघड होणार आहे. 

बनावट स्वॅब स्टिक बनविणाऱ्या कंपनीचा बुरखा उघड होणार?

 ऐन कोरोना महामारी वेळी हजारो नागरिकांच्या जीवितांशी खेळून बायोस्वॅब परदेशी कंपनीच्या नावाने बनावट कोरोना चाचणी स्वॅब स्टिक बनविणाऱ्या कंपनीचा बुरखा फाडण्याची मागणी होत आहे. यामागे मोठे रैकेट असून मोठे मासे फसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या स्वब स्किटचा राज्यासह देशात वितरण झाले का? याबाबत चौकशी होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याArrestअटकPoliceपोलिसulhasnagarउल्हासनगर