Coronavirus : धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 18:34 IST2020-05-15T18:30:02+5:302020-05-15T18:34:17+5:30
Coronavirus : याप्रकरणी सीआरपी 174 प्रमाणे नोंद करण्यात आल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली.

Coronavirus : धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
ठाणे - ताप आल्याने आपल्या कोरोना झाल्याच्या भीतीने ठाण्यातील 60 वर्षीय दिलीप केळसकर या वयोवृद्धाने जंगलातील झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली असून याप्रकरणी सीआरपी 174 प्रमाणे नोंद करण्यात आल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली.
ठाण्यात कोरोनाचे दिवसेंदिवस मोठया प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. त्यातच केळसकर यांना ताप येत असल्याने ते 13 मे रोजी कळवा येथील रुग्णालयात गेले होते. त्या रुग्णालयातील गर्दी पाहून घाबरून ते तसेच माघारी घरी आले. त्यानंतर, त्यांनी 14 मे रोजी वागळे इस्टेट रोड नंबर 28 या परिसरातील जंगलात गेले. तेथे कोरोनाच्या भीतीने त्यांनी झाडाच्या फांदीला नायलॉन दोरीच्या मदतीने गळफास घेतला. त्याचदरम्यान त्यांना त्यांच्या मुलाने उपचारार्थ ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तसेच,डॉक्टरांनी त्यांचा स्वॅब घेतला आहे.अशी माहिती श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी दिली.
Coronavirus : लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांनी पोलिसांवर केला जीवघेणा हल्ला