शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

Coronavirus : पोलीस वसाहतीमध्ये भितीचे सावट, पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 9:00 PM

Coronavirus : बोरिवली पोलीस वसाहतीतील उपनिरीक्षकाला कोरोनाची लागण

ठळक मुद्देबोरिवली पोलीस वसाहतीतील उपनिरीक्षकाला करोनाची लागण झाल्याने या वसाहतीतील राहीवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.          कुरार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या उपनिरीक्षक राहत असलेली इमारत सील करण्यात आली आहे.

मुंबई - वरळी पोलीस वसाहतीत दोन कोरोनाबाधित पोलीस आढळून आल्याने एक इमारत सील करण्यात आली. त्यापाठोपाठ बोरिवली पोलीस वसाहतीतील उपनिरीक्षकाला करोनाची लागण झाल्याने या वसाहतीतील राहीवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.        

कुरार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या उपनिरीक्षक राहत असलेली इमारत सील करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या संर्पकात आलेल्या पोलिसांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. वरळी, नायगाव आणि मरोळ या मोठ्या पोलीस वसाहतीसह मुंबईत ४६ पोलीस वसाहती आहेत. यात हजारो पोलीस कुटुंबिय वास्तव्यास आहेत. मुंबईकरांच्या सेवेसाठी घरातील मंडळीचा विचार न करता ही मंडळी रस्त्यावर कार्यरत आहेत. कोरोना संदर्भात लागू करण्यात आलेल्या आदेशाची अमलबजावणी, नाकाबंदी, वाहन तपासणी, बंदोबस्त, कस्तुरबा रुग्णलयातील सुरक्षा व्यवस्था, चाचणीसाठी आलेल्या किंवा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या, नातेवाईकांची नोंदणी, रुग्णाचा मृत्यू झाल्यास पंचनाम्यापाूसन अंत्यविधींपर्यंतची जबाबदारी, विलगीकरण केंद्रांबाहेरील बंदोबस्त, होम क्वारंटाईनचे शिक्के  असलेल्या व्यक्तीची माहिती घेणे, दिल्लीतील धार्मिक संमेलनातून परतलेल्या व्यक्तींचा शोधसह विविध  बंदोबस्ताची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे  पोलीस कुटुंबियामध्ये कोरोनाबाबत भिती वाढत आहे. त्यामुळे पोलिसांच्या स्वास्थ्याकड़े विशेष लक्ष देण्याचे विनंती पोलिसांकड़ून होत आहे.

अशीही व्यथासुमारे ४५ हजार फौजफाटा असलेल्या मुंबई पोलीस दलातील बहुतांश अधिकारी आणि अंमलदार ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, कसारा, कर्जत, नवी मुंबई, पनवेल तसेच, वसई, विरार, पालघर अश्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. मुंबई लोकल हा एकमेव पर्याय असलेल्या या पोलिसांना प्रशासानाकडून सोडण्यात येणाऱ्या बसमधून एकत्रित येण्याची भिती वाटत आहे. त्यामुळे मिळेल त्या वाहनाने किंवा स्वतःच्या दुचाकी, चारचाकी वाहनाने ड्युटीचे ठिकाण गाठावे लागत आहे. यात दैनंदिन २०० ते ५०० रुपयांच्या पेट्रोलच्या खर्चाच्या मोठा चाप पोलिसांच्या खिशाला बसला आहे. याबाबतही विचार होणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई