Coronavirus : क्वारंटाईन संपला! तबलिगी जमातींवरील कारवाईला सुरुवात; 18 जणांना पाठवले तुरुंगात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 19:43 IST2020-05-15T19:40:41+5:302020-05-15T19:43:09+5:30
भोपाळ - भोपाळमध्ये तबलीगी जमात येथून परतणार्या जमातींवर कारवाईला सुरुवात झाली. जमातीच्या कार्यक्रमामधून परत आल्यानंतर या लोकांनी माहिती लपविली होती. त्यानंतर ...

Coronavirus : क्वारंटाईन संपला! तबलिगी जमातींवरील कारवाईला सुरुवात; 18 जणांना पाठवले तुरुंगात
भोपाळ - भोपाळमध्ये तबलीगी जमात येथून परतणार्या जमातींवर कारवाईला सुरुवात झाली. जमातीच्या कार्यक्रमामधून परत आल्यानंतर या लोकांनी माहिती लपविली होती. त्यानंतर पोलिसांनी अशा लोकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. जमातींना शोधल्यानंतर त्यांना अलगीकरण (क्वारंटाईन) केंद्रामध्ये ठेवले. क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर पोलीस तबलिगीना तुरूंगात पाठवित आहेत.
गुरुवारी, क्वारंटाईन केंद्रामध्ये वेळ पूर्ण केलेल्या 18 जमातींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. कोर्टाने सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अटक केलेल्या जमातींविरोधात पासपोर्ट कायदा, विदेशी कायदा आणि लॉकडाउनचे उल्लंघन केल्याची प्रकरणे आहेत. माध्यमांशी बोलताना एएसपी मनु व्यास म्हणाले की, तलैया, मंगलवारा पोलिस ठाण्यात 18 जमातींना अटक करण्यात आली असून त्यापैकी 8 विदेशी आहेत.
या लोकांना तुरूंगात पाठविण्यात आले होते
तुरुंगात पाठविलेल्यांमध्ये कझाकस्तान, दक्षिण आफ्रिका, टांझानिया, महाराष्ट्र आणि बिहारमधील आरोपी आहेत. सर्व लोकांचा असा आरोप आहे की, माहिती लपवून तसेच धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घेत ते शहरात राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोपाळ येण्यापूर्वी सर्व आरोपी दिल्लीच्या मरकजमध्ये सामील झाले आहेत. यासह, ते भोपाळमधील इस्लामपुरा आणि मंगळवाड्यातील मोमानी मशिदी येथे धार्मिक समारंभात सहभागी झाले होते.
Coronavirus : धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या