CoronaVirus Lockdown : उत्तरप्रदेशच्या 22 कामगारांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 06:03 PM2020-03-31T18:03:11+5:302020-03-31T18:05:59+5:30

CoronaVirus Lockdown : देशातील लॉकडाऊन मध्ये शहरात हाताला काम मिळत नसल्याने उपासमारीऐवजी उत्तरप्रदेश येथील गावी जाण्यासाठी 24 कामगार रविवारी रात्री साडे अकरा वाजता निघाले.

CoronaVirus Lockdown : Arrested Tempo driver carrying 22 workers of Uttar Pradesh in ulhasnagar pda | CoronaVirus Lockdown : उत्तरप्रदेशच्या 22 कामगारांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकाला अटक

CoronaVirus Lockdown : उत्तरप्रदेशच्या 22 कामगारांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकाला अटक

Next
ठळक मुद्देयाप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालक व मदतनीस रामभाऊ टोकाडे व हिरधारीलाल यादव याना अटक करून गुन्हा दाखल केला आहे.मध्यवर्ती पोलिसांनी कामगारांना रात्रभर महापालिकेच्या तात्पुरत्या निवारा केंद्रात ठेवले.

उल्हासनगर - शहरातील 24 कामगार टेम्पोतून उत्तरप्रदेशला जात असताना रविवारी रात्री साडे अकरा वाजता मध्यवर्ती पोलिसांनी पकडले. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालक व मदतनीस रामभाऊ टोकाडे व हिरधारीलाल यादव याना अटक करून गुन्हा दाखल केला आहे.


देशातील लॉकडाऊन मध्ये शहरात हाताला काम मिळत नसल्याने उपासमारी ऐवजी उत्तरप्रदेश येथील गावी जाण्यासाठी 24 कामगार रविवारी रात्री साडे अकरा वाजता निघाले. टेम्पो कल्याण ते अंबरनाथ रस्त्याने जात असतांना पोलिसांनी टेम्पोची झाडाझडती घेतली. तेव्हा टेम्पोत 24 कामगार मिळून आले. त्यांच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, हाताला काम मिळत नसल्याने उपासमार सुरू झाली होती. भुकेने मरण्या पेक्षा नाईलाजाने ओळखीच्या टेम्पोची उत्तरप्रदेश येथील गावी निघाल्याचे ते म्हणाले. मात्र शहरातच पोलिसांनी आमचे बिंग फुटल्याची कबुली कामगारांनी दिली. 

 

मध्यवर्ती पोलिसांनी कामगारांना रात्रभर महापालिकेच्या तात्पुरत्या निवारा केंद्रात ठेवले. तर टेम्पो चालक व मदतनीस रामभाऊ टोकाडे व गिरधारीलाल यादव यांना पोलिसांनी टेम्पोसह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. टेम्पोतून उत्तरप्रदेश येथील गावी जाणाऱ्या 24 कामगारांना पोलिसांनी सकाळी शहरातील त्यांच्या घरी व नातेवाईकाकडे होऊ दिले. नाका कामगार, मोलमजुरी करणारे कामगार, घरेलू कामगार, कचरा वेचक महिला कामगार यांना मदत करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. दरम्यान महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी समाजसेवी संस्था चालक व पदाधिकारी तसेच राजकीय पक्ष नेत्यांना अन्नदान करण्यासाठी प्रभाग समिती निहाय महापालिकेच्या प्रत्येकी एक शाळा वाटप करण्यासाठी दिली. त्याठिकानाहून गोरगरीब व गरजूंना अन्नधान्याचे सोशल डिस्टन्स ठेवून वाटप करता येणार आहे. अन्य ठिकाणाहून अन्नधान्य वाटप करण्यास आयुक्तांनी मनाई केली .

Web Title: CoronaVirus Lockdown : Arrested Tempo driver carrying 22 workers of Uttar Pradesh in ulhasnagar pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.