coronavirus: Fraud under the pretext of helping soldiers in the Galvan Valley | coronavirus: गलवान खोऱ्यातील जवानांना मदत करण्याच्या बहाण्याने फसवणूक

coronavirus: गलवान खोऱ्यातील जवानांना मदत करण्याच्या बहाण्याने फसवणूक

मुंबई : गलवान खो-यातील जवानांना सेफ्टी ग्लास दान करण्याच्या बहाण्याने तरुणाला लाखोंचा चुना लावल्याची घटना सायनमध्ये समोर आली. याप्रकरणी सायन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत पोलीस अधिक तपास करत आहेत.

सायन सर्कल परिसरात तक्रारदार तरुण कुटुबियांसोबत राहतो. तो एमबीएचे शिक्षण घेत आहे. सोबतच तो वडिलांच्या चष्म्याचे दुकानात काम करतो. निमित याने मोबाईलमध्ये इंडियामार्ट नावाचे अँप्लिकेशन डाउनलोड करत, दुकानातील माल विक्रीची आँर्डर मिळण्यासाठी आणि ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी तो या अँपचा वापर करतो.

२८ जून रोजी आंनद सिंगने गलवान खो?्यातील जवानांना दान करण्यासाठी सेफ्टी ग्लास आवश्यक असल्याचे सांगत, ४ हजार सेफ्टी ग्लास आवश्यक असल्याचा संदेश धाड़ला. त्यानुसार निमितने फोटो पाठवले. त्यातून निवड करत, प्रतिनग ५५ रुपए देण्याचे ठरले. ४ हजार नगांचे २ लाख २० हजार होत असल्याचे निमित याने त्याला कळविले.

त्याने आॅर्डर पाठविण्यासाठी वान्द्रे-कुर्ला संकुलातील विदेश भवन, मिनिस्ट्री आँफ एक्सटर्नल अफेअर्स पत्ता पाठवून, ओळखपत्रेही पाठवली. गुगल पे वरून सुरूवातीला २ रुपये पाठवले. त्यानंतर व्हाँटसआॅपवर आर्मी चेक आणि १० हजार लिहलेला एक क्युआर कोड पाठवुन तो स्कैन करण्यास सांगितले. यातच तरुणाच्या खात्यातून तब्बल १ लाख रुपये गमावले. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.

Web Title: coronavirus: Fraud under the pretext of helping soldiers in the Galvan Valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.