Coronavirus: भाजपा कार्यकर्त्याच्या सांगण्यावरून केले गोमूत्र प्राशन; पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 10:11 AM2020-03-19T10:11:50+5:302020-03-19T10:12:17+5:30

अखिल भारतीय हिंदू महासभेने गोमूत्र पार्टीचं आयोजन केलं होतं.  गोमूत्र प्यायल्याने कोरोना दूर होतो, असा दावा हिंदू महासभेने केला.

Coronavirus: BJP worker arrange cow urine party; one man feel ill, arrested hrb | Coronavirus: भाजपा कार्यकर्त्याच्या सांगण्यावरून केले गोमूत्र प्राशन; पण...

Coronavirus: भाजपा कार्यकर्त्याच्या सांगण्यावरून केले गोमूत्र प्राशन; पण...

Next

गोमूत्र प्यायल्याने कोरोना दूर होतो, असा दावा हिंदू महासभेने केला होता. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गोमूत्र पाठविण्यात येणार होते. मात्र, लोकांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाजपाच्या कार्यकर्त्याला गोमूत्र प्राशन करण्यास प्रवृत्त करणे चांगलेच महागात पडले आहे.

अखिल भारतीय हिंदू महासभेने गोमूत्र पार्टीचं आयोजन केलं होतं.  गोमूत्र प्यायल्याने कोरोना दूर होतो, असा दावा हिंदू महासभेने केला. या पार्टीचा व्हिडीओ बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ट्विट केलाय. यामध्ये हिंदू महासभेचे सदस्य गोमूत्र प्राशन केल्यास कोरोनाची लागण होत नसल्याचा दावा करताना दिसत होते. मात्र, भाजपाने अशाच प्रकारे ठेवलेल्या कार्यक्रमात पोलिसांनी एकाला अटक केली आहे. 

एक भाजपाचा कार्यकर्ता कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र पिण्याचा सल्ला देत होता. यासाठी एक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. या कार्यकर्त्याने सांगितल्याने एका व्यक्तीने गोमूत्राचे प्राशन केले आणि काही वेळातच त्याला अस्वस्थ वाटू लागले. ही घटना कोलकातामध्ये घडली. कोलकाता पोलिसांनी तक्रार मिळाल्यानंतर भाजपाच्या कार्य़कर्त्याला अटक केली असून त्याचे नाव नारायण चॅटर्जी आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, हा चॅटर्जी कोरोनाची भीती दाखवून लोकांना फसवणूक होता आणि गोमूत्र प्राशन करण्यासाठी दबाव आणत होता. 

कच्च्या तेलाने गाठला तब्बल 16 वर्षांपूर्वीचा निचांक; मुंबईतील आजचे दर पहा

Coronavirus: हाहाकार! इटलीमध्ये 24 तासांत 475 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; विद्यार्थी बनले डॉक्टर

भाजपाचे पश्चिम बंगालचे नेते दिलीप घोष यांनी या कारवाईचा विरोध केला आहे. त्यांनी सांगितले की, गोमूत्र प्राशन केल्याने काही नुकसान होत नाही. मी त्याचे सेवन करतो याचा मला पश्चाताप होत नाही. कोरोना व्हायरसमुळे 
गोमूत्र प्यायल्याने कोरोना दूर होतो, या दाव्याचा काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने विरोध केला आहे. 
 

Web Title: Coronavirus: BJP worker arrange cow urine party; one man feel ill, arrested hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.