कोरोनाबाधित पतीला रुग्णालयात भरती न करता नेले होते घरी, पत्नीविरुध्द गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 22:13 IST2020-10-05T22:12:34+5:302020-10-05T22:13:35+5:30
Coronavirus : या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस नायक विलास मातेरे व पप्पू कठाणे करीत आहेत. सदर व्यक्तीला वेळीच उपचार मिळाले असते तर त्याचा जीवही वाचला असता.

कोरोनाबाधित पतीला रुग्णालयात भरती न करता नेले होते घरी, पत्नीविरुध्द गुन्हा दाखल
भंडारा : कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतरही व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याऐवजी घरी घेवून गेले. दरम्यान त्याचा दुसऱ्या दिवशी उपचाराविना मृत्यू झाला. आता मृत व्यक्तीच्या पत्नीच्या विरुध्द लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लाखांदूर येथे घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
लाखांदूर येथील एक व्यक्ती २८ सप्टेंबर रोजी तपासणी पॉझिटिव्ह आढळून आले. त्याला भंडारा येथे रुग्णालयात दाखल करण्याची सूचना दिली. मात्र कुटुंबियांनी त्या व्यक्तीला भंडारा येथे घेवून जाण्याऐवजी चक्क घरी आणले. दरम्यान दुसºया दिवशी त्याचा उपचाराविना मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली. दरम्यान शुक्रवार २ आॅक्टोबर रोजी या घटनेची तक्रार वैद्यकीय अधीक्षक सुनील रंगारी यांनी लाखांदूर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरुन विविध कलमान्वये मृतकाच्या पत्नीविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले. रुग्णाप्रती हयगय व निष्काळजीपणाचे कृत्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस नायक विलास मातेरे व पप्पू कठाणे करीत आहेत. सदर व्यक्तीला वेळीच उपचार मिळाले असते तर त्याचा जीवही वाचला असता. परंतु कुटुंबियांची निष्काळजी त्याला भोवली.