शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
2
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
3
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
4
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
6
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
7
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
8
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
9
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
10
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
11
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
12
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
13
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
14
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
15
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
16
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
17
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
18
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
19
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
20
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी

Corona virus : धक्कादायक ! कोरोनाची लागण झाल्याने आईकडे जाण्यास मनाई करणार्‍या पत्नीला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 12:22 PM

फिर्यादी महिलेच्या पतीला व मुलाला कोरोनाची लागण

ठळक मुद्देया प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : कोरोनाची लागण झाली असल्याने खोपोलीला स्वत:च्या आईकडे जाऊ नये, असे सांगणाऱ्या पत्नीलाच पतीने बेल्टने मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घोरपडी पेठेतील बी टी कवडे रोडवरील सोलेस पार्क येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी ३८ वर्षाच्या पत्नीने मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ कोरोनाची लागण झालेल्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन घ्यावे. लक्षणे दिसत नसली तरी त्यांनी घरातच रहावे.त्यांनी बाहेर फिरु नये, असे सातत्याने आवाहन केले जात आहे़ तरी अनेक जण घराबाहेर फिरत असतात़ अशा होम क्वारंटाईन केलेल्या परंतु, बाहेर फिरणाऱ्या लोकांवर यापूर्वी पोलिसांनी कारवाई करुन गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिलेच्या पतीला व तिच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. असे असताना तिचा पती स्वत:च्या आईकडे खोपोलीला जात होता.आपल्यामुळे इतरांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून तुम्ही खोपोलीला आईकडे जाऊ नका, असे सांगून पत्नीने मनाई केली. यावरुन त्यांच्यात २७ जूनला मध्यरात्री साडेबारा वाजता भांडणे झाली. तरीही पती खोपोलीला जाण्यावर ठाम होता. पत्नी आपल्याला आईकडे जाऊ देत नाही, या रागातून पहाटे ३ वाजता त्याने पत्नीला शिवीगाळ करीत हाताने, बेल्टने व लाकडी काठीने पोटावर, पाठीवर मारहाण करुन जखमी केले़ पत्नीवर उपचार केल्यानंतर तिने फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही लोक किती निष्काळजी आहेत, याचे हे एक प्रातिनिधीक उदाहरण ठरावे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसWomenमहिलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस