पोलीस हवालदाराने ४ वर्षे पत्नीसारखे ठेवले, सर्व उपभोग घेतला...; 'लिव्ह-इन' मध्ये राहणाऱ्या तरुणीने उचलले टोकाचे पाऊल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 11:22 IST2026-03-13T11:20:19+5:302026-03-13T11:22:49+5:30

Cop Live-in Relationship Case :

Cop Live-in Relationship Case: Police constable kept her as his wife for 4 years, took all the benefits...; Young woman living in 'live-in' takes extreme step | पोलीस हवालदाराने ४ वर्षे पत्नीसारखे ठेवले, सर्व उपभोग घेतला...; 'लिव्ह-इन' मध्ये राहणाऱ्या तरुणीने उचलले टोकाचे पाऊल  

पोलीस हवालदाराने ४ वर्षे पत्नीसारखे ठेवले, सर्व उपभोग घेतला...; 'लिव्ह-इन' मध्ये राहणाऱ्या तरुणीने उचलले टोकाचे पाऊल  

आग्रा: उत्तर प्रदेशातील आग्रा येथे पोलीस दलाला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. ताजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. विशेष म्हणजे, ही तरुणी एका पोलीस हवालदारासोबत गेल्या ४ वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. आत्महत्येपूर्वी तरुणीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यात तिने हवालदारावर गंभीर आरोप केले आहेत.

आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये तरुणीने सांगितले की, "आरोपी हवालदार जे.बी. गौतम याने मला लग्नाचे आमिष दाखवून गेल्या ४ वर्षांपासून पत्नीप्रमाणे सोबत ठेवले. सर्व उपभोग घेतला. पण आता जेव्हा लग्नाची वेळ आली, तेव्हा त्याने कुटुंबाचे कारण देऊन नकार दिला. त्याने माझे शारीरिक आणि मानसिक शोषण केले." तरुणीने व्हिडिओत हवालदाराच्या भावावरही अशाच प्रकारचे आरोप केले आहेत. तो देखील असाच एका मुलीसोबत राहत असल्याचे तिने सांगितले.तसेच पोलीस कर्मचारी असल्याने त्याच्यावर कारवाई होणार नाही, असेही तिने म्हटले आहे. 

पोलीस हवालदाराला अटक आणि निलंबन
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आग्रा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली. डीसीपी सिटी अली अब्बास यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत आरोपी हवालदार जे.बी. गौतम याला निलंबित केले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title : यूपी: पुलिसकर्मी ने किया महिला का शोषण, शादी से इनकार, आत्महत्या

Web Summary : आगरा: एक महिला ने पुलिस अधिकारी पर शादी का झांसा देकर चार साल तक शोषण करने का आरोप लगाते हुए आत्महत्या कर ली। उसने अधिकारी पर शारीरिक और मानसिक शोषण का आरोप लगाया, जब उसने शादी करने से इनकार कर दिया। अधिकारी को गिरफ्तार कर निलंबित कर दिया गया है।

Web Title : UP Cop Exploited Woman, Lived Like Wife, She Commits Suicide

Web Summary : Agra: A woman committed suicide after alleging a police officer exploited her for four years under the guise of marriage. She accused him of physical and mental abuse when he refused to marry her. The officer has been arrested and suspended.