IPS अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न, घरातील नोकर ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 13:25 IST2021-09-08T13:23:13+5:302021-09-08T13:25:51+5:30
IPS Patna news: घरात एकट्या असलेल्या दहा वर्षीय मुलीवर घरातील स्वयंपाक्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

IPS अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न, घरातील नोकर ताब्यात
पटणा: बिहारमध्ये एका वरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या घरी उघडकीस आलेल्या खळबळजनक घटनेत घरातील स्वयंपाक्याने महिला आयपीएसच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी 10 वर्षांची मुलगी घरी एकटी होती. ही संधी साधून 50 वर्षीय आरोपी मुलीच्या खोलीत आला आणि खोलीचे दार आतून बंद केले. यानंतर त्याने मुलीला चुकीच्या हेतूने स्पर्श केला. पण, मुलीने याचा विरोध केल्यावर तो तेथून निघून गेला आणि मुलीला शांत करण्याच्या उद्देशाने 200 रुपयांचे मोठे चॉकलेट आणून दिले. बच्चा कुमार असे आरोपीचे नाव आहे.
https://t.co/W0uxoAKAuu
— Lokmat (@MiLOKMAT) September 8, 2021
उत्तर प्रदेशसाठी भाजपने तैनात केले 8 केंद्रीय मंत्री.#bjp#election
असा झाला खुलासा
पीडित मुलीला आरोपीचा चुकीचा स्पर्श कळाला आणि आई घरी आल्यानंतर तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला. यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर बलात्काराच्या प्रयत्नासह पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आरोपी त्या आयपीएस अधिकाऱ्याचा जुना स्वयंपाकी आहे. या मुलीचा जन्मही त्याच्या समोरच झाला. आरोपीने मुलीला लहानपणी मांडीवर बसवून भरवले होते. पण, आता तिच्यासोबत अशी गोष्ट केल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.