शहरं
Join us  
Trending Stories
1
चार माेठे पाऊस पूर आणणार; मुंबईत मान्सून पॅटर्न बदलतोय, हवामान तज्ज्ञांचा इशारा 
2
Video - कुवेतमध्ये अग्नितांडव! १९६ मजुरांना इमारतीत ठेवलेलं कोंबून; झोपेतच गमावला जीव
3
तीन पट सॅलरी, टॅक्स फ्री इनकम...! भारतीयांच्या बळावर चालतो कुवेत, जाणून घ्या किती मिळतं वेतन?
4
पाकिस्तानच्या संरक्षण बजेटमध्ये १५% वाढ; दारूगोळा, हत्यारे खरेदीसाठी ५४८ अब्जची तरतूद!
5
जी-७ शिखर परिषदेसाठी नरेंद्र मोदी इटलीला रवाना, जॉर्जिओ मेलोनी यांची घेणार भेट!
6
मराठमोळ्या खेळाडूवर ५ वर्षात दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया; स्वत: दिली महत्त्वाची अपडेट!
7
फिल्म सिटीबाहेर कचऱ्याचा ढीग! शशांक केतकर संतापला, म्हणाला- "गेल्या १० वर्षात ही जागा कधीच स्वच्छ..."
8
WI vs NZ : वेस्ट इंडिजचा 'सुपर' विजय! न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून जवळपास बाहेर; यजमानांचा झंझावात
9
वादग्रस्त कारकिर्दीनंतर डॉ. संजीव ठाकूर पुन्हा सोलापूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये रुजू होणार!
10
‘ॲक्टोसाइट’मुळे होणार रेडिओथेरपी अधिक सुसह्य, दुष्परिणाम कमी करणारे औषध बाजारात ; एफएसएसएआयची मान्यता
11
'आमचा विरोध नाही, पण...'! UCC संदर्भात JDU नेत्याचं विधान, भाजपचं टेन्शन वाढणार
12
पंजाब CM भगवंत मान यांनी तुरूंगात घेतली अरविंद केजरीवालांची भेट, मोठा निर्णय होणार?
13
'ये रिश्ता क्या कहलाता हैं' फेम अभिनेत्यावर कोसळलं आर्थिक संकट; भाड्याच्या घरात रहायची आली वेळ
14
महिलांना ५० हजार रुपयांचे कॅश व्हाउचर, जगन्नाथ मंदिरासाठी ५०० कोटी; ओडिशाच्या माझी सरकारच्या पहिल्या कॅबिनेटमधील निर्णय
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२४ : घरात सुखशांती नांदेल, शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील
16
ऐतिहासिक! रोहितने गांगुलीची 'दादा'गिरी संपवली; असं करणारा ठरला पहिला भारतीय कर्णधार
17
पाकिस्तानी दहशतवादी काश्मीरमध्ये घुसले; छावण्या, रेल्वेवर हल्ल्याची भीती, लष्कर सतर्क
18
कंगनावर झालेल्या हल्ल्यानंतर दिग्दर्शक करण जोहरची प्रतिक्रिया, म्हणाला - "मी कोणत्या प्रकारच्या"
19
WI vs NZ : ६ षटकार! न्यूझीलंडचा सांघिक खेळ; पण वेस्ट इंडिजकडून एकट्याने किल्ला लढवला
20
अकरावी-बारावीसाठी हजार रुपये, तर पदव्युत्तरसाठी मुलींना २,५०० रुपये, आसाम सरकार देणार विद्यावेतन

तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगाराला डोंबिवलीतून अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 6:31 PM

पथकाने आरोपी त्याचे घराला चारी बाजूने घेराव घालून अटक केली. 

ठळक मुद्देकालन हा आरोपी हेदुटणे गाव बदलापूर पाईप लाईन रोड मानपाडा डोंबिवली पूर्व येथे राहायचायाच पत्त्यावर आरोपी शिवाजी किसन कालन आला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.   घराच्या मागे शेतजमीन आणि जंगलात पळत असताना पोलिसांनी थरारक पाठलाग करून करून पकडले.

कल्याण - कल्याण गुन्हे शाखेने आज दुपारी 1 ते 2 वाजताच्या दरम्यान मानपाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार शिवाजी किसन कालन (25) याला मानपाडा पोलीस ठाण्याने एक वर्षाकरिता तडीपार केलेले असताना तो आपल्या घरी आलेला आहे अशी गुप्त बातमीदारामार्फत बातमी कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली होती. त्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पोलीस उप निरीक्षक निलेश पाटील, पोलीस उप निरीक्षक नितीन मुदगुन, पोलीस हवालदार दत्ताराम भोसले, राजेंद्र खिलारे राजेंद्र घोलप, निवृत्ती थेरे आणि हरिश्चंद्र बंगारा यांच्या पथकाने आरोपी त्याचे घराला चारी बाजूने घेराव घालून अटक केली. 

कालन हा आरोपी हेदुटणे गाव बदलापूर पाईप लाईन रोड मानपाडा डोंबिवली पूर्व येथे राहायचा. याच पत्त्यावर आरोपी शिवाजी किसन कालन आला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस आपल्या घरी येणार असल्याचा सुगावा लागताच कालन आपल्या घराच्या मागील बाजूच्या खिडकीतून उडी मारून पोलिसांना चकवा देऊन त्याच्या  घराच्या मागे शेतजमीन आणि जंगलात पळत असताना पोलिसांनी थरारक पाठलाग करून करून पकडले. या आरोपी त्याच्यावर मानपाडा पोलीस ठाण्याच्या अभिलेखावर नागरिकांवर दहशत निर्माण करणे चाकू, तलवार वापरणे वार करणे, धमकावणे तसेच नागरिकांना लुटणे (रॉबरी) असे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. या आरोपीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 अन्वये कारवाई करून मानपाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिसkalyanकल्याणdombivaliडोंबिवली