काँग्रेसचे पदाधिकारी महेश मिराणी यांच्यावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 21:41 IST2019-03-07T21:40:15+5:302019-03-07T21:41:23+5:30

पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Congress party karyakarta Mahesh Mirani attacked | काँग्रेसचे पदाधिकारी महेश मिराणी यांच्यावर हल्ला

काँग्रेसचे पदाधिकारी महेश मिराणी यांच्यावर हल्ला

ठळक मुद्दे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी गंगाधर भोसले यांच्याशी संपर्क केला असता झाला नाही. विठ्ठलवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

उल्हासनगर - शहर काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष महेश मिराणी यांच्यावर भाजप पदाधिकाऱ्यांनी जीवघेणा हल्ला केला. गंभीर जखमी झालेले मिराणी यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कॅम्प नं-4 मुख्य मार्केट मध्ये भाजपचे पदाधिकारी गंगाधर भोसले शिवीगाळ करीत असल्याची माहिती महेश मिराणी यांचा मुलगा दीपक याने दिली. काय प्रकार झाला असावा म्हणून मिराणी विश्वकर्मा मोबाईल दुकानात गेले. त्यावेळी पाठीमागून आलेले गंगाधर भोसले, दीपक सुदरांनी यांच्यासह चौघानी महेश मिराणी यांच्यासह मुलगा दीपक, पावन व ओरूर जावेद यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत मिराणी यांच्या गळ्यावर वार झाल्याने ते खाली कोसळले. दरम्यान भोसलेसह अन्य साथीदारांनी पलायन केले. जखमीं झालेल्या मिराणी यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असून काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राधाचरण करोतीया, कुळदीपसिंग माथरू यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. हल्लाप्रकरणी संबंधितावर कारवाई करण्याची मागणी करोतीया यांनी पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे यांना केली आहे. महेश मिराणी यांच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिसांनी भाजपचे पदाधिकारी गंगाधर भोसले यांच्यासह चौघावर गुन्हा दाखल केला. भोसले पासून कुटुंबाला धोका असल्याची प्रतिक्रिया मिराणी यांनी पत्रकारांना दिली असून भाजप समर्थक आमदार गणपत गायकवाड यांचे गंगाधर भोसले कट्टर समर्थन पदाधिकारी असल्याचे मिराणी यांना सांगितले. या प्रकाराने परिसरात भाजप विरोधात काँग्रेस असे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी गंगाधर भोसले यांच्याशी संपर्क केला असता झाला नाही. विठ्ठलवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

Web Title: Congress party karyakarta Mahesh Mirani attacked