तृतीयपंथीचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 14:15 IST2018-07-21T14:14:21+5:302018-07-21T14:15:04+5:30

मालाड परिसरात बांगूर नगरमधील धक्कादायक घटना

Complaint of third-party sexual abuse | तृतीयपंथीचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार 

तृतीयपंथीचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार 

मुंबई - बारावीत शिकत असलेल्या एका तृतीयपंथीचे एका ३५ वर्षीय इसमाने लैंगिक शोषण केल्याची घटना मालाड परिसरातील बांगूर नगरमध्ये घडली आहे. पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. पीडित तृतियपंथ्यानी पोलिसांच्या हलगर्जीपणाने आरोपी फरार झाल्याचे सांगितले आहे.

गोरेगाव येथील सुभाष नगर येथे रहाणाऱ्या आपल्या मावशीच्या भेटीसाठी श्वेता (बदललेले नाव) जून महिन्यात आली होती. त्यावेळी घराबाहेर उभी असताना या आरोपीशी तिची ओळख झाली. आरोपीला तिच्या मावशीला ओळखत होता. श्वेताशी ओळख झाल्यानंतर त्याने श्वेताला २० जून रोजी घरी चहा पिण्यासाठी बोलावले. त्यावेळी त्याच्या घरात कोणीही नव्हते. घरात बोलावून त्याने श्वेतासोबत बळजबरी लैंगिक शोषण केले. तिने याचा विरोध केला असता त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. त्याने एक दिवस श्वेताला आपल्या घरीच थांबवून ठेवले. तिने त्याच्या घरातून पळून ही गोष्ट मावशीला सांगितली. यानंतर मावशीबरोबर जाऊन श्वेताने बांगूर नगर पोलिसांकडे याची तक्रार केली होती. सुभाष शिंदे असे या आरोपीचे नाव असून तो विवाहित असून १३ वर्षीय मुलगा आहे.

पीडित श्वेता ही पोरकी आहे. तिचे आई-वडिल ती लहान असतानाच मयत झाले. पालघर येथील एका इंग्रजी शाळेत शिकत असलेली श्वेता नुकतीच १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. मात्र, तृतीयपंथी असल्यामुळे तिला शाळेतूनही काढण्यात आले. श्वेताला पुढे शिकण्याची इच्छा आहे. मात्र, शाळेतून काढण्यात आल्यानंतर तिचे शिक्षण येथेच थांबेल असे तिने सांगितले. 

Web Title: Complaint of third-party sexual abuse