साडे सात लाखांच्या दागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार, दागिने सापडले घरातच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 16:36 IST2022-10-27T12:40:23+5:302022-10-27T16:36:41+5:30

संगमेश्वर पोलिसांनी 24 तासाच्या आतच दागिने केले हस्तगत

Complaint of theft of jewelery worth seven lakhs, jewelery was found in the house in devrukh ratnagiri | साडे सात लाखांच्या दागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार, दागिने सापडले घरातच

साडे सात लाखांच्या दागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार, दागिने सापडले घरातच

रत्नागिरी - देवरुख - संगमेश्वर  तालुक्यातील नावडी बाजारपेठ येथील वैशाली संजय रहाटे (वय ४४ ) यांनी संगमेश्वर पोलीस स्थानकात आपल्या राहत्या घरातील कपाटातील सोन्याचे सुमारे साडेसात लाखाचे दागिने चोरी झाल्याची फिर्याद संगमेश्वर पोलीस स्थानकात दिली होती. यामुळे राहत्या घरात झालेल्या चोरीमुळे खळबळ उडाली होती.

याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी वाघमारे यांनी संगमेश्वर पोलीस स्थानकात भेट देत पोलिसांना मार्गदर्शन केले होते.अखेर हे दागिने घरातच सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संगमेश्वर पोलिस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक देशमुख, पोलीस सचिन कामेरकर, किशोर जोयशी, आव्हाड, कांबळे, विश्वास बरगाळे, प्रशांत शिंदे, पंदेरे यांनी तपास केला. तपासामध्ये चोरीला गेलेले दागिने घरातूनच हस्तगत केले आहेत. पोलिसांनी २४ तासाच्या आतच चोरीच्या छडा लावत दागिने हस्तगत केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.

Web Title: Complaint of theft of jewelery worth seven lakhs, jewelery was found in the house in devrukh ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.