अभिनेत्री दिव्या दत्ताविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 21:11 IST2018-09-03T21:10:29+5:302018-09-03T21:11:10+5:30

हे प्रकरण पंजाबी नाटक 'तेरी अमृता'शी संबंधित आहे. 'तेरी अमृता'चे कॉपीराइट ओमपुरी कंपनीकडे असताना दिव्या दत्ता हिने नंदिता यांची परवानगी न घेता ते नाटक सुरु करण्याची घोषणा केली आहे.

Complaint against the actress Divya Dutta in Versova police station | अभिनेत्री दिव्या दत्ताविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार 

अभिनेत्री दिव्या दत्ताविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार 

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री दिव्या दत्ता हिच्यासह तीन जणांविरुद्ध अंधेरीतील वर्सोवा पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्‍यात आली आहे. दिवंगत अभिनेता ओम पुरी यांची पत्नी नंदिता पुरी यांनी लिखित स्वरुपात ही तक्रार दाखल केली आहे. लेखक जावेद सिद्दकी आणि अभिनेता अमरीक गिल यांचीही नावे तक्रारीत आहेत.

हे प्रकरण पंजाबी नाटक 'तेरी अमृता'शी संबंधित आहे. 'तेरी अमृता'चे कॉपीराइट ओमपुरी कंपनीकडे असताना दिव्या दत्ता हिने नंदिता यांची परवानगी न घेता ते नाटक सुरु करण्याची घोषणा केली आहे. नंदिता यांनी आपल्या राइट्ससाठी दिव्याला संपर्क केला होता. परंतु दोघींमध्ये तडजोड होऊ शकली नाही असे आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्यांनी अभिनेता, सिंगर गुरुदास मानसोबत 9 सप्टेंबरला मुंबईत प्रीमियर ठेवण्यात आला आहे. 

Web Title: Complaint against the actress Divya Dutta in Versova police station