दिलासा! डीसीपींच्या परवानगीनंतरच दाखल होणार गुन्हा, पोलीस आयुक्तांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 14:56 IST2022-06-09T14:43:14+5:302022-06-09T14:56:18+5:30
Mumbai police Commissioner : अटकेमुळे आरोपीची नाहक बदनामी होते, समाजातील त्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागतो आणि मोठ्या प्रमाणावर आरोपीचे वैयक्तिक नुकसान होते. म्हणून यास आळा घालण्यासाठी कार्यालयीन आदेश जारी केला आहे.

दिलासा! डीसीपींच्या परवानगीनंतरच दाखल होणार गुन्हा, पोलीस आयुक्तांचे आदेश
मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून, प्रॉपर्टीच्या वादावरून, पैशाच्या देण्याघेण्यावरून अथवा वैयक्तिक कारणांवरून पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत अथवा विनयभंगाची तक्रार करण्यात येते. या गुन्ह्यांत कोणतीही शहानिशा न करता आरोपीस तात्काळ अटक केली जाते. तपासादरम्यान केलेली तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न होते आणि त्यानंतर आरोपीस कलम १६९ सीआरपीसी अंतर्गत डिस्चार्ज करण्याची कारवाई केली जाते. तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. अटकेमुळे आरोपीची नाहक बदनामी होते, समाजातील त्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागतो आणि मोठ्या प्रमाणावर आरोपीचे वैयक्तिक नुकसान होते. म्हणून यास आळा घालण्यासाठी कार्यालयीन आदेश जारी केला आहे.
अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी गुन्हा दाखल करताना सदर प्रकरणात सहाय्यक पोलीस आयुक्त यांची शिफारस आल्यानंतर परिमंडळीय पोलीस उपायुक्त यांच्या परवानगी नंतरच गुन्हा दाखल करण्यात यावा अशी सूचना देण्यात येत आहे. परिमंडळीय पोलीस उपयुक्त यांनी परवानगीचा निर्णय घेताना सर्वोच्च न्यायालयांचे ललिता कुमारी प्रकरणातील न्यायनिर्णयाचे पालन होईल याची दक्षता घ्यावी असे कार्यालयीन आदेश मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी जारी केले आहेत.
दिलासा! डीसीपींच्या परवानगीनंतरच दाखल होणार गुन्हा, पोलीस आयुक्तांचे आदेश pic.twitter.com/AUg0z2XV9I
— Lokmat (@lokmat) June 9, 2022