बापरे! रागाच्या भरात 'तो' कॉलेजमध्ये घुसला, आधी 'तिला' मिठी मारली, मग गोळी मारली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 19:22 IST2023-05-18T19:20:43+5:302023-05-18T19:22:04+5:30

कॉलेजच्या डायनिंग हॉलमध्ये घडला प्रकार, नंतर मुलाने स्वत:वरही झाडून घेतली गोळी

college student love affair crime news Noida boy first hugged girl and shot her then killed himself | बापरे! रागाच्या भरात 'तो' कॉलेजमध्ये घुसला, आधी 'तिला' मिठी मारली, मग गोळी मारली...

बापरे! रागाच्या भरात 'तो' कॉलेजमध्ये घुसला, आधी 'तिला' मिठी मारली, मग गोळी मारली...

Love Affair, Crime Greater Noida: देशाची राजधानी दिल्लीमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या विविध घटना वाचायला मिळतात. तशातच आता ग्रेटर नोएडामध्ये एका विद्यार्थ्याने एका विद्यार्थिनीची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली. विद्यार्थिनीची हत्या केल्यानंतर मुलाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्याही केली. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी कानपूरची रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. तर ज्या विद्यार्थ्याने स्वत:वर गोळी झाडून घेतली, तो अमरोहा येथील आहे. ही संपूर्ण घटना ग्रेटर नोएडा येथील शिव नाडर विद्यापीठात घडली. विद्यार्थ्याने ही हत्या का केली याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे त्या मुलीला आधी मिठी मारून मग गोळी मारण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

ही दोन्ही मुले-मुली ग्रेटर नोएडा येथील शिव नाडर विद्यापीठात शिकत होते. दोघेही विद्यापीठात बीए समाजशास्त्राच्या तृतीय वर्षात शिकत होते. दोघांमध्ये काही वाद झाला, त्यामुळे गुरुवारी विद्यार्थ्याने विद्यापीठाच्या डायनिंग हॉलमध्ये विद्यार्थिनीची गोळी झाडून हत्या केली, त्यानंतर पळून जाऊन बॉईज हॉस्टेल गाठले. मुलांच्या वसतिगृहात जाऊन त्या मुलानेही बंदुकीची गोळी स्वत:वर झाडून आत्महत्या केली. हे प्रकरण दादरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून पोलिसांनी या संपूर्ण घटनेची लिंक जोडून तपास सुरू केला आहे.

मिठी मारली आणि गोळी मारली

मिळालेल्या माहितीनुसार, अनुज असे हत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो त्याच विद्यापीठातील त्याच विभागात शिकत होता, ज्यामध्ये ही मुलगीही शिकली होती. अनुज आणि विद्यार्थी चांगले मित्रही होते, मात्र काही दिवसांपासून दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद सुरू होता. जो गुरुवारी दोघांच्या मृत्यूने संपला. गुरुवारी अनुज युनिव्हर्सिटीच्या डायनिंग हॉलमध्ये तरुणीला भेटला, दोघांमध्ये काही वेळ बोलणे झाले आणि त्यानंतर अनुजने मुलीला मिठी मारली आणि पिस्तूल काढून तिच्यावर गोळीबार केला. मुलीची हत्या केल्यानंतर अनुजने मुलांच्या वसतिगृहातील 328 क्रमांकाच्या खोलीत धाव घेतली आणि त्याच पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडली आणि आत्महत्या केली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांनाही कळवले.

Web Title: college student love affair crime news Noida boy first hugged girl and shot her then killed himself