बंद खोलीत प्रेमी जोडप्याने कापल्या हाताच्या नसा; प्रेयसीचा झाला मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 20:23 IST2021-06-09T19:36:47+5:302021-06-09T20:23:01+5:30

Crime News : युवकावर रुग्णालयात अद्याप उपचार सुरू आहे. या घटनेची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत की दोघांनी हे पाऊल का उचलले आहे.

In a closed room the loving couple cut off the veins of the hand; The girlfriendt died | बंद खोलीत प्रेमी जोडप्याने कापल्या हाताच्या नसा; प्रेयसीचा झाला मृत्यू 

बंद खोलीत प्रेमी जोडप्याने कापल्या हाताच्या नसा; प्रेयसीचा झाला मृत्यू 

ठळक मुद्देसंपूर्ण प्रकरणात विजय नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी एमवाय रुग्णालयात पाठविला व तपास सुरू केला.

इंदौर  - मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये एका प्रेमळ जोडप्याने बंद खोलीत हाताच्या नसा कापून घेतल्या आहे. यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना विजयनगर पोलिस स्टेशन परिसरात असलेल्या मालविनय नगरची आहे. पोलिसांनी त्या जोडप्याला दवाखान्यात नेले आहे, जिथे मैत्रिणीचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी, युवकावर रुग्णालयात अद्याप उपचार सुरू आहे. या घटनेची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत की दोघांनी हे पाऊल का उचलले आहे.


त्याचबरोबर असेही सांगितले जात आहे की, दोघांचे प्रेमसंबंध होते आणि कुटुंबातील लोक लग्नासाठी तयार होत नव्हते, यामुळे प्रेमी जोडप्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. सद्यस्थितीत विजय नगर पोलिस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. अजल असे या युवकाचे नाव सांगण्यात येत आहे आणि त्या मुलीचे नाव पूजा आहे. प्रियकर अजलच्या खोलीत प्रेयसीने आपल्या हाताची  नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.


मिळालेल्या माहितीनुसार, अजल हा मूळचा खंडवाचा असून पूजा जवळच खोली भाड्याने घेऊन येथे काम करतो. घटनेनंतर दोघांनाही दवाखान्यात नेण्यात आले, तेथे पूजाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचबरोबर अजलची प्रकृती चिंताजनक आहे. त्याचवेळी संपूर्ण प्रकरणात विजय नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी एमवाय रुग्णालयात पाठविला व तपास सुरू केला. तसेच या घटनेची माहिती दोन्ही तरुणांच्या कुटुंबातील सदस्यांना देण्यात आली आहे.

Web Title: In a closed room the loving couple cut off the veins of the hand; The girlfriendt died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.