लग्नानंतर दोनच महिन्यांत अख्ख घर केलं 'साफ', फिल्मी स्टाईलने 'लुटेरी दुल्हन' झाली फरार; पती म्हणतो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 18:16 IST2025-05-27T18:16:23+5:302025-05-27T18:16:55+5:30
या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला असल्याचे एसएचओ कांचन भास्कर यांनी म्हटले आहे.

प्रतिकात्मक फोटो
बिहारमधील पश्चिम चंपारण्यमधील योगापट्टी येथून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांनंतर, एक 'लुटेरी दुल्हन' अख्खे घर साफ करून फिल्मी स्टाईलने फरार झाल्याची अथवा पळून गेल्याची घटना घडली आहे. ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याची शक्यता आहे. तिने घरातील दागिने, कपडे आणि इतर वस्तूही लंपास केल्या आहेत. कुटुंबातील सदस्यांनी तिचा शोध घेतला. मात्र ती कुठेही सापडली नाही. यानंतर, पतीने पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. ही घटना २० मे रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित तरुणाचे लग्न दोन महिन्यांपूर्वीच झाले होते. या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला असल्याचे एसएचओ कांचन भास्कर यांनी म्हटले आहे.
संबंधित पीडित पतीचे नाव राजाबाबू असून त्याने पोलीस ठाण्यात दिलेल्या अर्जा म्हटले आहे की, "माझे लग्न दोन महिन्यांपूर्वी निशु देवीसोबत झाले होते. लग्नाच्या काही दिवसांनंतर, निशु मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीसोबत बोलत होती. मी तिला बोलतानाही पकडले होते. यानंतर तिला फटकारल्यानंतर, तिने बोलणे बंद केले होते. दरम्यान ती ज्या नंबरवर बोलत होती, तो नंबर मी लिहून ठेवला होता. २० मे रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास त्याच नंबरवरून फोन आला होता.
यानंतर ती (पत्नी) घरातून दागिने, कपडे आणि इतर मौल्यवान साहित्य घेऊन पळून गेली. ती तोच नंबर असलेल्या तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याची शक्यता आहे. मी माझ्या पातळीवर तिला शोधण्याचा प्रचंड प्रयत्न केला. मात्र, ती कुठेही सापडली नाही. यानंतर, मी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करत आहे. संंबंधित 'लुटेरी दुल्हन'चे हे कृत्य परिसरात चर्चेचा विषय बनले आहे.