धक्कादायक! लहान भावाला जीवे मारण्याची धमकी, मित्रानेच दहावीच्या विद्यार्थीनीवर केला वारंवार बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 17:49 IST2023-04-10T17:48:28+5:302023-04-10T17:49:17+5:30

पोलिसांनी मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

class 10th student sexual assault by school friend in palwal by threatening to kill younger brother | धक्कादायक! लहान भावाला जीवे मारण्याची धमकी, मित्रानेच दहावीच्या विद्यार्थीनीवर केला वारंवार बलात्कार

धक्कादायक! लहान भावाला जीवे मारण्याची धमकी, मित्रानेच दहावीच्या विद्यार्थीनीवर केला वारंवार बलात्कार

भावाला जीवे मारण्याची धमकी देऊन दहावीतील विर्द्यार्थीनीवर वर्गातील एका मुलाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलाने मुलीचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याचीही धमकी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गैरकृत्यात आरोपीला अन्य दोन तरुणींनीही मदत केली असल्याची माहिती समोर आली आहे. 

उल्हासनगरात तरुणांची भर रस्त्यात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तिसर्‍यांदा बोलावल्यानंतर विद्यार्थिनीने आरोपीकडे जाण्यास नकार दिल्यावर आरोपीने तिचे अश्लील फोटो इंटरनेटवर व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात आरोपी दोन मुलींसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.

महिला स्टेशन प्रभारी सुशीला देवी यांच्या म्हणण्यानुसार, होडल पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात राहणाऱ्या एका विधवा महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, तिची १५ वर्षांची मुलगी दहावीची परीक्षा दिली आहे. आपल्या मुलीसोबत शिकणाऱ्या एका किशोरने आपल्या मुलीचे अश्लील फोटो व्हायरल केले आहेत.

महिलेने पोलिसांना सांगितले की, आरोपी आणि तिची मुलगी एकाच शाळेत शिकतात. मागील वर्षी आरोपी शाळेत टीसी घेण्यासाठी आला होता. तेथे त्याने आपल्या मुलीला एका खोलीत ओढून नेले आणि आरोपीने मुलीसोबत अश्लील फोटो काढले आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने बलात्कार केला.

Web Title: class 10th student sexual assault by school friend in palwal by threatening to kill younger brother