निर्घृण हत्या, जंगलात सापडला मान कापलेला मृतदेह; अद्याप ओळख पटलेली नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 18:44 IST2022-04-17T18:44:30+5:302022-04-17T18:44:58+5:30
Murder Case : माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली. सध्या पोलीस मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून त्याची ओळख पटवण्यात व्यस्त आहेत.

निर्घृण हत्या, जंगलात सापडला मान कापलेला मृतदेह; अद्याप ओळख पटलेली नाही
मेरठमधील शिवलखासजवळील जंगलातून एका मुलाचा शिरच्छेद केलेला मृतदेह सापडला आहे. त्याचे वय सुमारे 14-15 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एक शेतकरी शेतात पाणी घालण्यासाठी आला असता मृतदेहाची माहिती मिळाली.त्याला प्रथम मुलाचा मृतदेह दिसला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली. सध्या पोलीस मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून त्याची ओळख पटवण्यात व्यस्त आहेत.
याप्रकरणी पोलीस आजूबाजूच्या लोकांची चौकशी करत आहेत. एसपी देहत केशव कुमार यांनी सांगितले की, एका मुलाचा मृतदेह सापडला आहे, ज्याचे वय 14-15 वर्षे आहे. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलीस ओळख पटविण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यानंतरच काही सांगता येईल. सध्या गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई सुरू आहे.
दोन दिवसांपूर्वी एका महिलेचा खून झाला होता
दोन दिवसांपूर्वी मेरठमध्येही निर्घृण हत्या झाली होती. पतीने पत्नीवर हातोड्याने प्रहार करून खून केला होता. या व्यक्तीने पत्नीच्या डोक्यावर हातोड्याने वार केले आणि नंतर तिचा गळा चिरून तिची हत्या केली. खून केल्यानंतर आरोपीने स्वत: पोलीस ठाणे गाठून गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
मेरठमधील कंकरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील शिवलोक पुरी येथील रहिवासी असलेल्या देवेंद्र सिंहचा विवाह प्रतिमासोबत झाला होता. त्यांना 10 वर्षांचा मुलगाही आहे. प्रतिमा सरधना येथील नानू गावातील प्राथमिक शाळेत सरकारी शिक्षिका होती.
पती-पत्नीमध्ये अनेकदा वाद होत होते. पतीही दारू प्यायचा आणि अनेकदा पती-पत्नीमध्ये भांडण व्हायचे, हाणामारीपर्यंत परिस्थिती पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रत्यक्षदर्शी 10 वर्षांचा मुलगा आशुने सांगितले की, तो सकाळी मोबाईलवर गेम पाहत होता, यासाठी आईने त्याला शिवीगाळ केली आणि शाळेचा गृहपाठ पूर्ण न केल्याने मारहाण केली. इतक्यात त्याचे वडीलही तिथे पोहोचले. वडिलांचे डोके दुखत होते. मुलाच्या मारहाणीवरून पती-पत्नीमध्ये वाद होऊन पतीने पत्नीची हत्या केली.