शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

पबजी खेळताना मोबाईल फुटल्याने मुलांनी केले कोयत्याने वार; वडगाव शेरीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 7:45 PM

तीन अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल

ठळक मुद्दे

पुणे : पबजी गेम खेळताना मोबाईल फुटल्याने नुकसान भरपाईची मागणी करीत तिघा अल्पवयीन मुलांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या काकाच्या हातावर कोयत्याने वार करुन जखमी केले. याप्रकरणी अभिषेक सिंग (वय १८, रा़ वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. चंदननगर पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वडगाव शेरीमधील साईनगर येथे २० जुलैला रात्री साडेआठ वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक सिंग आणि आरोपी हे एकमेकांचे मित्र आहे. दोन महिन्यांपूर्वी अभिषेकने पबजी गेम खेळण्यासाठी एकाचा मोबाईल घेतला होता. खेळताना तो मोबाईल पडल्याने त्याचे नुकसान झाले होते़. त्यामुळे ही मुले त्याच्याकडे नुकसान भरपाई म्हणून ३ हजार रुपये मागत होती. गेल्या दोन महिन्यांपासून अभिषेक त्यांना पैसे देतो, असे म्हणून पैसे देत नव्हता. ही मुले २० जुलै रोजी रात्री अभिषेककडे आली व त्याच्याकडे पैसे मागू लागली़ पैसे न दिल्याने त्याला मारहाण करु लागली होती. हा प्रकार त्याचे काका रुदलसिंग यांनी पाहिला व त्यांनी भांडणे सोडवून मुलांना तेथून हाकलून लावले. थोड्या वेळाने ही मुले परत आली व त्यांनी काकाच्या हातावर कोयत्याने वार करुन हाताने मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक व्ही़ एस मिसाळ अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :vadgaon-sheri-acवडगाव शेरीPUBG Gameपबजी गेमCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस