शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

छोटा राजन टोळीच्या हस्तक खंडणी प्रकरणात ६ वर्ष होता फरार, पुण्यात केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 3:39 PM

Gangster Chhota Rajan : याप्रकरणात छोटा राजनला झाली आहे शिक्षा

ठळक मुद्देपरमानंद हंसराज ठक्कर (वय ५६, रा. थ्री ज्वेल्स कोलते पाटील, टिळेकर नगर, कोंढवा) असे या छोटा राजनच्या हस्तकाचे नाव आहे.गुन्हे शाखेच्या युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले यांना ठक्कर हा पुण्यात रहात असल्याचे समजले त्यावरुन त्यांनी सीबीआयच्या पुणे व मुंबई कार्यालयातून माहिती घेतली.

पुणे : पनवेल येथील बांधकाम व्यावसायिकास २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणात गेल्या ६ वर्षापासून फरार असलेल्या छोट्या राजनच्या हस्तकाला गुन्हे शाखेच्या युनिट १ ने कोंढव्यातून अटक केली आहे. परमानंद हंसराज ठक्कर (वय ५६, रा. थ्री ज्वेल्स कोलते पाटील, टिळेकर नगर, कोंढवा) असे या छोटा राजनच्या हस्तकाचे नाव आहे.पनवेल येथील बांधकाम व्यावसायिक नंदु वाझेकर व अदित्य दाढे यांची मार्केटयार्ड या भागात जमीन आहे. परमानंद ठक्कर यांने या जागेसंदर्भात बनावट कागदपत्रे तयार केली होती. तो प्रथम कुख्यात गुंड अश्विन नाईक याच्याकडे गेला होता. परंतु, त्याने मदत न केल्याने ठक्कर सुरेश शिंदे याच्याशी संपर्क साधला व नंदु वाझेकर यांना घेऊन चेंबुरला गेला होता. त्यावेळी सुरेश शिंदे व छोटा राजन यांचे फाेनवर बोलणे झाले. त्यावेळी छोटा राजन याने वाझेकर यांना २५ कोटी रुपये दे, सर्व प्रकरण मिटवतो. नाही तर तुला बघुन घेऊ, तुला खलास करुन, अशी धमकी दिली होती. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी २०१५ मध्ये खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.या गुन्ह्यात छोटा राजन ऊर्फ राजन निकाळजे, त्याच्या टोळीतील सुरेश शिंदे, अशोक निकम, सुमीत म्हात्रे यांना नवी मुंबई प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी २ वर्षे कैद व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. यातील संशयित परमानंद ठक्कर हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता.

शस्त्राचा धाक दाखवून २३ लाखाचा ऐवज लुटला; तीन संशयित सीसीटीव्हीत कैद

गुन्हे शाखेच्या युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले यांना ठक्कर हा पुण्यात रहात असल्याचे समजले त्यावरुन त्यांनी सीबीआयच्या पुणे व मुंबई कार्यालयातून माहिती घेतली. त्यानंतर कोंढव्यातील उच्चभ्रु भागात राहणार्या ठक्कर याला मंगळवारी ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर त्याला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चनसिंह, सहायक आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार योगेश जगताप, अजय थोरात, सचिन जाधव, महेश बामगुडे, आय्याज दड्डीकर, तुषार माळवदकर यांनी केली.

टॅग्स :Chhota Rajanछोटा राजनPuneपुणेunderworldगुन्हेगारी जगतArrestअटकExtortionखंडणी