शस्त्राचा धाक दाखवून २३ लाखाचा ऐवज लुटला; तीन संशयित सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 01:46 PM2021-02-03T13:46:05+5:302021-02-03T13:47:49+5:30

Dacoity : जळगावात पहाटे दरोडा 

Looted Rs 23 lakh out of fear of arms; Three suspects jailed on CCTV | शस्त्राचा धाक दाखवून २३ लाखाचा ऐवज लुटला; तीन संशयित सीसीटीव्हीत कैद

शस्त्राचा धाक दाखवून २३ लाखाचा ऐवज लुटला; तीन संशयित सीसीटीव्हीत कैद

Next
ठळक मुद्देबुधवारी पहाटे ३.१५ ते ४ या वेळेत तब्बल ४५ मिनिटे हा थरार सुरु होता. दरम्यान, या तीन दरोडेखोरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत.

जळगाव : चाकूसारख्या धारदार शस्त्राचा धाक दाखवून पिंटू बंडू इटकर (३५) या व्यापाऱ्याच्या घरातून २० लाखाचे दागिने व ३ लाख रुपये रोख असा २३ लाखाचा ऐवज लुटून नेल्याची थराराक घटना बुधवारी पहाटे ३.१५ ते ४ या वेळेत जळगावातील मोहाडी रस्त्यावरील दौलत नगरात घडली. बुधवारी पहाटे ३.१५ ते ४ या वेळेत तब्बल ४५ मिनिटे हा थरार सुरु होता. दरम्यान, या तीन दरोडेखोरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत.


मोहाडी रस्त्यावरील दौलत नगरात पिंटू बंडू इटकर यांचा अलिशान बंगला आहे. त्यात ते पत्नी मनिषा व मुलगी हरिप्रिया (वय ३) यांच्यासह वास्तव्याला आहेत.इटकर हे स्टीलचे होलसेल व्यापारी आहेत. मंगळवारी रात्री घरात ते पत्नी व मुलगी असे तिघंच होते. मु‌ख्य प्रवेशद्वारावरुन उडी घेऊन दरोडेखोर बंगल्यात शिरले. वरच्या मजल्यावर आल्यावर त्यांनी झोपलेल्या दाम्पत्याला उठविले व एकाने गळ्याला शस्त्र लावून जीव प्यार आहे ना असे धमकावत घरातील रोकड व दागिने काढायला लावले. सर्व जणांनी अंगात स्वेटर व तोंडाला रुमाल बांधलेला होता तर एकाने काळ्या रंगाचे जोकर मास्क लावलेले होते. सर्व जण मराठी अर्थात खास करुन जळगाव जिल्ह्यात बोलली जाणारी भाषा बोलत होते. कपाटाच्या ड्रावरमध्ये ठेवलेले तीन लाख रुपये रोख व कपाटात ठेवलेले २० लाखाचे सोन्याचे दागिने काढून पिशवीत टाकले. जातांना दोघांजवळील मोबाईल हिसकावून घेत घरातून पळ काढला. जातांना मोबाईल खाली लोखंडी गेटजवळ ठेवले होते.

दरोडेखोर २५ ते ३५ वयोगटातील
पिंटू इटकर यांच्या बंगल्यात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. त्यातील एका कॅमेऱ्याचा डीव्हीआर काढून दरोडेखोरांनी नेलेला आहे तर दुसऱ्या एका कॅमेऱ्यात तीन जण कैद झालेले आहेत. लोखंडी गेटवरुन उडी घेऊन आतमध्ये येतांना व वरच्या मजल्यावर जातांना स्पष्टपणे दिसून येत आहे. सर्वांचे वय साधारण २५ ते ३५ वयोगटातीलच आहे. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन इटकर दाम्पत्याला धीर दिला.

Web Title: Looted Rs 23 lakh out of fear of arms; Three suspects jailed on CCTV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.