काँग्रेस नेत्याने कुटुंबासह घेतले विष; दोन मुले अन् पत्नीसह चौघांचाही उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 13:54 IST2024-09-01T13:54:47+5:302024-09-01T13:54:59+5:30
Chhattisgarh Congress Leader Suicide : या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे.

काँग्रेस नेत्याने कुटुंबासह घेतले विष; दोन मुले अन् पत्नीसह चौघांचाही उपचारादरम्यान मृत्यू
Chhattisgarh Congress News : छत्तीसगडच्या जांजगीर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील स्थानिक काँग्रेस नेते पंचराम यादव यांनी पत्नी आणि दोन मुलांसह विष प्राशन करून सामूहिक आत्महत्या केली (Chhattisgarh Congress Leader Suicide) आहे. या आहत्महत्येचे नेमके कारण समोर आले नाही, पण प्राथमिक माहितीनुसार, कर्जाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उपचारादरम्यान सर्वांचा मृत्यू झाला
मिळालेल्या माहितीनुसार, 30 ऑगस्टच्या रात्री काँग्रेस नेत्यासह चौघांनी विष प्राशन केले. दुसऱ्या दिवशी दुपारी 12 च्या सुमारास शेजारील मुलीने त्यांचे दार ठोठावले, पण तिला घराला कुपूल लावल्याचे दिसले. संध्याकाळपर्यंत घराला कुलूप लावल्याचे पाहून आजुबाजूच्या लोकांना संशय आला आणि त्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतमध्ये चौघेही विष प्राशन करुन गंभीर अवस्थेत पडलेले आढळले. त्यांच्या तोंडातून फेस येत होता आणि त्याला उलट्याही झालेल्या होत्या.
यानंतर चौघांनाही रात्री आठच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची गंभीर प्रकृती असल्याने पुढे रात्रीच सिम्सला रेफर करण्यात आले. या घटनेत मोठा मुलगा नीरज (28) याच रात्री मृत्यू झाला, तर पहाटेच्या सुमारास पंचराम यादव (66), पत्नी नंदानी यादव (55) आणि सूरज यादव (25) यांनी यांनी जीव सोडला. शेजाऱ्यांनी सांगितले की, यादव कुटुंबावर कर्जाचा मोठा बोजा होता, ज्यामुळे ते अनेक दिवसांपासून चिंतेत होते.